शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

या बंडामागे शरद पवार असण्याची शंका, राज ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 19:31 IST

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं

पुणे - राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही घरात जावा तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील, एवढी चीड जनतेला या राजकारणाची आली आहे, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील बंडखोरीच्या राजकारणावर मत व्यक्त केलं. तसेच, घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र, हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं, अशी टीकाही राज यांनी केली. तर, या बंडामागे शरद पवारांचाच हात आहे, असेही राज यांनी म्हटले. यावेळी, तीन वरिष्ठ नेत्यांची नावे त्यांनी घेतली.  

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी आले असताना राज यांनी पत्रकारांबरोबर बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या सर्व किळसवाण्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पाटील, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. हे तिघे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शंका येते. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज यांनी व्यक्त केली. उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही, या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

सध्या कोण कुठे आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सांगता येईल, बाबू वागसकर कुठे आहेत तर ते मनसेत आहेत असे सांगता येते, बाकी कोण कुठे, कोणाबरोबर आहे हे सांगणे अशक्य आहे. कॅरम एकदम कसा तरी फुटला आहे, कोणाची गोटी कोणाच्या भोकात असे सांगता येणार नाही असे राज यांनी म्हटले. यासंबधी आपण लवकरच आयोजित मनसेच्या मेळाव्यात सविस्तर बोलू असेही स्पष्ट केले. राज यांच्याबरोबर यावेळी मनसेचे बाबू वागसकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारprafull patelप्रफुल्ल पटेल