शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसी यंत्रांच्या किमतीत ग्राहकांची दुहेरी लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 11:23 IST

शहरामध्ये विविध प्रकारच्या एकाच उत्पादनांची दोन वेगवेगळ्या किमतींना विक्री करण्यात येत आहे. बऱ्याचदा त्याचा फसव्या सवलती देण्यासाठी देखील वापर केला जातो.

ठळक मुद्दे ग्राहकांची फसवणूक : कंपनीच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार

विशाल शिर्के- पुणे : चहापाठोपाठ चक्क वातानुकूलित यंत्रणा (एसी) देखील दुहेरी किमतीला विकली जात असल्याचे उघड झाले आहे. पुणे जिल्हा वैधमापन विभागाने डायकीन या प्रसिद्ध कंपनीची सुमारे प्रत्येकी सव्वादोन लाख रुपयांची दोन्ही एसी यंत्र जप्त केली आहेत. तसेच, संबंधित कंपनीच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. शहरामध्ये विविध प्रकारच्या एकाच उत्पादनांची दोन वेगवेगळ्या किमतींना विक्री करण्यात येत आहे. बऱ्याचदा त्याचा फसव्या सवलती देण्यासाठी देखील वापर केला जातो असे, ग्राहक संघटनांचे मत आहे. गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने चहाच्या कंपनीची फसवेगिरी समोर आणली होती. ‘ग्राहकराजाची फसवणूक’ या मथळ्याखाली २१ जून रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर वैधमापन विभागाने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली होती. तसेच, या वृत्तानंतर राज्यात एकाच उत्पादनाची दुहेरी किमतीला विक्री करण्यात येत नाही ना, हे शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वैधमापन विभागाचे राज्याचे अतिरिक्त महासंचालक संदीप बिश्नोई यांच्या सूचनेनुसार जिल्हा वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक एन. पी. उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गिरीश वाघमारे यांच्या पथकाने तपासणी केली. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली येथील नेवासकर लॉजिस्टिक्सच्या तपासणीत प्रसिद्ध डायकीन एसी कंपनीचे एकाच प्रकारचे उत्पादन दुहेरी किमतीला विकण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  एकाच पद्धतीचे उत्पादन दोन वेगवेगळ्या किमतींना विकता येत नाही. एकाच वस्तूची दोन किमतीने विक्री केल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकाला प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद आहे. दुसºयांदा असा प्रकार घडल्यास संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालविला जातो. संबंधितांवर वैधमापन कायदा २००९च्या पॅकेज कमोडीटी रुल २०११ नुसार कारवाई करण्यात येते.  याबाबत माहिती देताना वजन मापे विभागाचे अधिकारी उदमले म्हणाले, एकाच उत्पादनाची दुहेरी किमतीला विक्री होत असल्याबाबत शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत डायकीन कंपनीच्या एकाच प्रकारच्या एसीची किंमत वेगवेगळी असल्याचे आढळले. एका एसीवर २ लाख १८ हजार ७०० आणि दुसºया एसीवर २ लाख ३७ हजार २०० रुपये एमआरपी होती. दोन्ही एसी जप्त करण्यात आले आहेत. ..........सरकारने एमआरपी कायदा बदलायला हवा. प्रत्येक उत्पादकाला उत्पादनाची किंमत आणि एमआरपी अशा दोन्ही किमती नोंदविणे बंधनकारक करायला हवे. त्यामुळे उत्पादनाची किंमत, त्यावरील कर अशी माहिती आपोआपच समजेल. कंपन्यांकडून करण्यात येणाºया फसवेगिरीला आळा बसेल. अशा प्रवृत्तींवर केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांनी विक्री केलेले युनिटही माघारी बोलावले पाहिजे. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. - विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणेजिल्हा वजनमापे विभागाने राबविलेल्या मोहिमेत एसीच्या एकाच उत्पादनाची किंमत वेगवेगळी आढळून आली. दोन्ही एसी जप्त करण्यात आले आहेत. कंपनी आणि कंपनीच्या सर्व संचालकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव वजन मापे विभागाच्या उपनियंत्रकांकडे पाठविण्यात येईल. ही तपासणी मोहीम या पुढेदेखील चालूच राहील. - एन. पी. उदमले, सहायक नियंत्रक, वैधमापन विभाग पुणे जिल्हा

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी