शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो; पोलिसिंग करा टिक टॉक व्हिडिओ नको..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:31 IST

लाठीचार्ज करताना केले जाते टिक टॉक

ठळक मुद्देपरिस्थिती चिघळू नये याची काळजी घेण्याची गरज कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरात केली वाहतूक बंदी

पुणे : शहरात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. रस्त्यांवर शुकशुकाट आहे. सगळीकडे शांततापूर्ण वातावरण आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पोलीस हटकून घरी जाण्यास सांगत आहेत. जे ऐकत नाहीत त्यांना लाठीचा प्रसाद मिळत आहे. असे असताना काही पोलीस नागरिकांना फटकवत असतानाचे व्हिडिओ तयार करत आहेत. इतकेच नव्हे तर त्याचे टिक टॉक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरात वाहतूक बंदी केली. यामुळे सगळीकडे रस्ते ओस पडले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर जो दिसेल त्याला घरी पाठवण्यात येत आहे. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र चुकून कुणी महत्वाच्या कामाकरिता घराबाहेर पडल्यास त्याला फटके मारण्यास पोलीस मागेपुढं पाहत नाहीत. ते एवढ्यावर थांबत नाहीत तर त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत आहेत. अनेकांनी वाहतुकदाराना लाठीचार्ज करताना टिक टॉक व्हिडिओ बनवून ते आपल्या फेसबुक व व्हाट्सअप अकाऊंटवर शेयर केले आहेत. वास्तविक पोलीस आणि राज्य प्रशासन यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व नागरिक शांतपणे आदेशाचे पालन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडिओ तयार करून ते शेयर करणे कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांडून विचारला जात आहे. सध्या वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुपवर पोलिसांच्या अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावर अनेकांनी पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले आहे. नागरिकांना समज देण्याकरिता काही वेळा अशा प्रकारची कृती करावी लागते. असे मेसेज पाठवून पोलिसांची पाठराखण केली असली तरीदेखील ज्याला मारहाण केली जात आहे त्याचा व्हिडीओ तयार करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. शहरातील सध्याच्या पोलिसिंग बद्दल पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. मिलींद पवार म्हणाले, संचारबंदीचे नियोजन करणे पोलिसांचे काम आहे. जे ऐकत नाहीत त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी काही प्रमाणात लाठीचार्ज योग्य आहे. मात्र त्याचा अतिरेक नको. याचे कारण म्हणजे सध्या जनता भयभीत झाली आहे. सगळेजण घरात बसून आहे. प्रत्येकाच्या समस्या आहेत. त्यातून आणखी वेगळे काही व्हायला नको. पोलिसांनी फ्री हँड दिल्याप्रमाणे वागता कामा नये. पोलिसांनी व्हिडिओ काढू नये. टिक टॉक तर अजिबात करू नये. अशाने समाजात वेगळा मेसेज जाऊ नये. याची काळजी पोलिसांनी घ्यावी.

..........

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.... नागरिकांमध्ये अद्याप स्वयंशिस्तीचा अभाव दिसून येतो. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जे व्हिडिओ व्हायरल होतात त्यातून समाज प्रबोधन होते असे मला वाटते. हा सगळा प्रकार म्हणजे पुढच्यास ठेच मागचा शहाना असे म्हणावे लागेल. मात्र यासगळ्या प्रकारचा अतिरेक नको. मारहाण करण्यापेक्षा समजुतीने घ्यावे. थोड्या फार प्रमाणात भीती दाखवण्यासाठी लाठीचार्ज ठीक आहे. आता अनेकांना किराणा घेण्यासाठी तसेच, मेडिकल मध्ये इमर्जन्सी जावे लागते अशावेळी पोलिसांना आपले कारण नागरिकांना पटवून देता यायला हवे. - अरविंद पाटील (माजी एसीपी अधिकारी )

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉकTrafficवाहतूक कोंडीcorona virusकोरोना वायरस बातम्या