शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कचरा जाळून प्रदूषण करू नका, दिवाणी न्यायालयाचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:39 IST

कोविड रुग्णांवरील उपचाराचा वैद्यकीय कचरा दोन बिल्डरांच्या जागेत जाळण्यात येत असल्याचे समोर...

ठळक मुद्देस्थानिकांची न्यायालयात धाव; 

पुणे : कोरोनाच्या संशयित आणि बाधित रुग्णांवरील उपचारानंतर तयार झालेला वैद्यकीय कचरा विमानतळाजवळ असलेल्या दोन बिल्डरांच्या जागेत जाळण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. नागरिकांच्या तक्रारीवर त्या दोन बांधकाम व्यावसायिकांनी कचरा जाळून प्रदूषण आणि शेजारील जमिनीवर अतिक्रमण करू नये, असा अंतरिम आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे.     लोहगाव येथील नंदकिशोर, अंकुश आणि विकास तुकाराम बिडकर यांनी 'स्काय वन कॉपोर्रेट पार्क लिमिटेड' आणि 'ब्लू हेवन इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड' यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. बिडकर बंधूंची लोहगाव विमानतळाजवळ जागा असून त्यांच्याच बाजूला बिल्डरांचा प्लॉट आहे. बिल्डरांनी आमच्या जागेत अतिक्रमण केले, अशी बिडकरांची तक्रार असून त्यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्डरांच्या जागेत मात्र वादींच्या जमिनीला लागून कोरोनाचा कचरा जाळण्यात येत आहे.  त्यामुळे प्रदूषण होत असून परिसरात राहणा-या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच संबंधित बिल्डरांचे आमच्या जागेत अतिक्रमण सुरूच आहे, असा दावा बिडकर बंधूंनी अ‍ॅड. हरीश कुंभार, अ‍ॅड. राकेश उमराणी आणि अ‍ॅड. नितीश गायकवाड यांच्यामार्फत दावा केला होता. तक्रारदारांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिले होते. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. हा दिवाणी दावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.   प्रतिवादी यांनी यापूर्वी वादी यांच्या जागेत अतिक्रमण केले असून आत्तादेखील अतिक्रमण सुरूच आहेत. त्यास विरोध केल्याने कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. येथील जागेच्या सीमा यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्या आहेत, असा युक्तिवाद अ‍ॅड. उमराणी आणि अ‍ॅड. कुंभार यांनी केला. प्रतिवादी वादी यांच्या जागेत काय करणार आहेत, याचे फोटो अ‍ॅड. गायकवाड यांनी न्यायालयात दाखवले. या सर्वांचा विचार करून न्यायालयाने अंतरिम आदेश दिले आहेत. लॉकडाऊन असल्याचा गैरफायदा घेत प्रतिवादी तक्रारदारांच्या जागेत अतिक्रमण व कोरोनाचा कचरा जाळून प्रदूषण करीत आहेत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरांनी बिडकर यांच्या जागेत अतिक्रमण न करता कोरोनाचा कचरा जाळू नये, असा आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या