शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मावळ्यांना वेटर केले तर, खळखट्याक : संभाजी ब्रिगेडचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:45 IST

लग्नसराईत तसेच साेहळ्यांमध्ये अनेक हाॅटेल व्यावसायिक तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करुन घेण्यात येते. अश्या हाॅटेल चालक व इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांना संभाजी ब्रिगेडकडून इशारा देण्यात अाला अाहे.

पुणे : हाॅटेल तसेच केटरिंग व्यावसायिकांनी जर त्यांच्या वेटर्सला मावळ्यांचा ड्रेस काेड दिल्यास त्या हाॅटेल व केटरिंग व्यावसायिकांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विराेधात संभाजी ब्रिगेड स्टाईल अांदाेलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात अाला अाहे.     लग्नसराईत, साेहळ्यांमध्ये हाॅटेल, केटरिंग तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनचे लाेक त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांच्या पाेशाखात म्हणजेत एेतिहासिक पगडी, भाला व इतर पाेशाख घालून वेटरचे काम करावयास लावत अाहेत. हा त्या मावळ्यांचा अपमान अाहे. आपल्या  महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे 'मावळे' ही मराठी मनाची अस्मिता असून मावळे हे महाराष्ट्राचा अभिमान आहे.ज्यांनी स्वराज्य निर्माण करणेकामी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा अवमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता कदापी सहन करणार नाही. त्यामुळे मावळा जर वेटर म्हणून दिसला तर जिथे दिसेल तिथे ठाेकण्यात येईल असे संभाजी ब्रिगेड करुन सांगण्यात अाले अाहे.     तसेच संभाजी ब्रिगेडतर्फे हाॅटेल व्यवसायिकांना अावाहन करण्यात अाले अाहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करण्यास लावू नये. अन्यथा सदरच्या केटरिंग तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या कर्मचाऱ्यांवर ब्रिगेड स्टाईलने कारवाई करण्यात येईल. तसेच हाेणाऱ्या अार्थिक नुकसानीस शिवप्रेमी जबाबदार राहणार नाहीत. त्याचबराेबर ज्यांच्याकडे लग्नसोहळा आहे अशांनी या अवमान करणाऱ्या लोकांना अाॅर्डर्स देऊ नये अन्यथा लग्नसोहळ्यात विघ्न निर्माण झाल्यास शिवप्रेमी जबाबदार रहाणार नाही असेही ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडhotelहॉटेलmarriageलग्न