शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राजगडाचा सिंहगड करु नका! राजगडावरील 'रोप वे'ला तीव्र विरोध,पुण्यात शिवप्रेमी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:19 IST

राजगडावरील रोप वेसाठी विरोध करून शिवप्रेमी संघटनांनी वेळप्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे...

मार्गासनी: छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगडावर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. राजगड ही अतिशय पवित्र ऐतिहासिक वास्तू असून तिचे पावित्र्य रोपवे मुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजगडाचा सिंहगड करु नका. त्याचवेळी राजगडाच्या 'रोप वे'साठी आमचा विरोध असून प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याचे सांगत पुण्यात शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  प्रतिष्ठान,राष्ट्रसेवा समुह,दुर्गरक्षक संघटना,आदी संघटनानी केली आहे.

याबाबत शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम,राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे बारामावळ परिसराचे अध्यक्ष सचिन खोपडे,दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे पप्पु लिपाणे, विकास साळुंखे आदींनी पत्रकार परिषदेत शिवप्रेमी संघटनांची भूमिका स्पष्ट केली. 

शिवप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड आजही मोठ्या दिमाखात इतिहासांची साक्ष देत आहे. मात्र, राजगडावर रोप वेसाठी मंजुरी मिळाली आहे. या रोपवेला स्थानिकासह आमचा देखील तीव्र विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना दऱ्या- खोऱ्यातून गेल्याशिवाय इतिहासातील पराक्रम, मोहिमा समजणार कशा ? तसेच किल्ले राजगडावर रोप वे झाल्यास पर्यटन स्थळ म्हणून त्याचा वापर केला जाईल. त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजगडासारखी ऐतिहासिक वास्तू रोप वेमुळे नष्ट करु नका, या राजगडाच्या रोप वेसाठी आमचा विरोध असून प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. 

... 

राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असुन रोप वेमुळे या वास्तुचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. ते आम्ही होऊ देणार नाही

- महेश कदम, अध्यक्ष शिवशंभु प्रतिष्ठान, कात्रज...... राजगडावर रोप वे झाल्यास किल्ल्यावर हौशी पर्यटक जाऊन किल्ल्यावर अनैतिक गोष्टी सुरु होतील त्यामुळे आमचा रोप वेसाठी विरोध आहे.- राहुल पोकळे, अध्यक्ष, राष्ट्रसेवा समुह, धायरी.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज