सामाजिक शांततेचा भंग होऊ देऊ नका: पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:18+5:302021-09-06T04:14:18+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सचिन पाटील बोलत होते. या वेळी पोलीस ...

Don't let social peace be disturbed: Patil | सामाजिक शांततेचा भंग होऊ देऊ नका: पाटील

सामाजिक शांततेचा भंग होऊ देऊ नका: पाटील

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सचिन पाटील बोलत होते. या वेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, पोलिस पाटील जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल खोपडे,पो.पा.वैशाली जगताप, प्रीती कांबळे,पो. ह.भगीरथ घुले, युवराज धोंडे,गणेश मंडळांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिरे, उपक्रम राबवावेत. बिभत्स गाणी लावू नयेत, श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा केबल नेटवर्क वरून करावे, रोडरोमियोंविरुद्ध कडक केली जाईल, वर्गणीची सक्ती करून शांतता भंग करू नका, मंडळासमोर स्त्रिया व मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच फटाके वाजवू नयेत असे सूचित करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

०५ नसरापूर

बैठकीत मार्गदर्शन करताना सचिन पाटील व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सचिन पाटील व इतर.

050921\img-20210831-wa0027.jpg

सोबत फोटो व ओळ : नसरापूर(ता.भोर)येथे राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत मार्गदर्शन करताना भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी मान्यवर.

Web Title: Don't let social peace be disturbed: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.