शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ निघणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:52 IST

संभाजी (मनाेहर) भिडे यांच्या सन्मानार्थ उद्या बुधवार दि. 28 मार्च राेजी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा माेर्चा काढण्यात येणार अाहे. या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना करण्यात अाली अाहे.

पुणे : संभाजी (मनाेहर) भिडे यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात अाले. मुख्यमंत्र्यांनी जरी संभाजी भिडेंबाबत काेणताही पुरावा नसल्याचे म्हंटले असले तरी संभाजी भिडे हेच काेरेगाव-भिमा दंगलीचे खरे सुत्रधार असून त्यांच्या कार्यकत्यांनी बैठका घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केले.     साेमवारी संभाजी भिडे यांना सरकारने अटक करावी यामागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश अांबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 200 संघटनांनी एकत्र येत मुंबईत एल्गार माेर्चाचे अायाेजन केले हाेते. या माेर्चानंतर मुख्यमंत्र्यांना अाठ दिवसात संभाजी भिंडे यांना अटक करण्याचा अल्टिमेटम प्रकाश अांबेडकर यांच्याकडून देण्यात अाला अाहे. दरम्यान संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने  उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी अाता संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना करण्यात अाली अाहे.     याविषयी बाेलताना संताेष शिंदे म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी म्हंटले की भिडेंबाबत पुरावे नाहीत, परंतु भीमा-काेरेगाव दंगलीचे खरे मास्टरमाईंड हे संभाजी भिडे हेच अाहेत. त्यांच्या कार्यकत्यांनी घटनेच्या सहा-सात महिने अाधी बैठका घेऊन पत्रके वाटली हाेती. तिथल्या लाेकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांच्या कार्यकत्यांनी केले हाेते. त्याचे पुरावे पाेलसींकडे सुद्धा अाहेत, फक्त संभाजी भिडे अाणि पंतप्रधानांचे संबंध असल्यामुळे जाणीवपूर्वक मुख्यमंत्री भिडेंना पाठीशी घालत अाहेत.  त्यांना अटक ही झालीच पाहिजे. तसेच पाेलीसांनी या माेर्चाला परवानगी देऊ नये. एका अाराेपीच्या सन्मानार्थ माेर्चे निघतात अाणि या माेर्चांना सरकार परवानगी देत असेल तर सरकारच सामाजिक वातावरण गढूळ करण्यासाठी हे सगळं घडवून अाणतय का असा संशय निर्माण हाेईल. उद्याच्या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी अामची मागणी अाहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPuneपुणे