वाढीव कला-गुण देऊ नये.. शासन आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:43+5:302021-04-01T04:11:43+5:30
दिनांक २६ मार्च रोजी शासनाच्या शिक्षण विभागाने आदेश काढून चित्रकला ग्रेड परीक्षा यावर्षी रद्द करण्यात आल्या. त्याच बरोबर ग्रेड ...

वाढीव कला-गुण देऊ नये.. शासन आदेशाची होळी
दिनांक २६ मार्च रोजी शासनाच्या शिक्षण विभागाने आदेश काढून चित्रकला ग्रेड परीक्षा यावर्षी रद्द करण्यात आल्या. त्याच बरोबर ग्रेड परीक्षेचे वाढीव गुणही मिळणार नाहीत. असा तुघलकी निर्णय घेऊन .शासन आदेश काढून लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय केला. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.या आदेशाचा महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने निषेध केला असून या .शासन आदेशाला विरोध करून त्याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.या .शासन आदेशाचा विरोध करून त्याची होळी करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे, राज्य सह चिटणीस मिलिंद शेलार,पुणे विभागीय उपाध्यक्ष अशोक साबळे,पुणे जिल्हा सचिव संजय भोईटे, उपाध्यक्ष वाहिद खान,उपाध्यक्ष विजय कूचेकर, महिला आघाडीच्या प्रमुख अस्मिता गुरव ,पुरंदर कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बिभीषण देडे, महेश भोसले, पदाधिकारी उपस्थित होते.
:महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाच्या प्रतीची होळी केली