शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

टेन्शन घेऊन हायपर होऊ नका; रक्तदाब नियंत्रणासाठी पुरेशी झोप घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: October 18, 2023 13:44 IST

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे

पुणे : अपुऱ्या झोपेमुळे देखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत शकते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक सलग झोप घेत नाहीत त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे.

झोपेचा अभाव हे आरोग्याच्या विविध समस्यांशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक तयार करते. ज्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण वाढते. अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे त्यांची लवचिकता कमी होऊन त्या आकुंचन पावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात.

एरवी औषधांशिवाय उच्च रक्तदाब कमी होत नाही. परंतू, गाढ झोपेत आपले शरीर रक्तवाहिन्यांच्या कार्यातील अडथळे दूर करते आणि हार्मोनल संतुलन राखते. नियमित आणि पुरेशा झोपेला प्राधान्य दिल्यास आपण केवळ उच्चरक्तदाबचा धोका कमी करू शकत नाही तर त्याच्याशी संबंधित लक्षणे देखील कमी करू शकतो.

आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या

अपुरी झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यातील परस्परसंबंध ओळखून संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या. रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती मिळाल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते. उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आरोग्य समस्येला प्रतिबंध करण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करा. - डॉ. सम्राट शहा, इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट

रात्रीच्या वेळी शांत झोप लागावी यासाठी हे करा

- झोपण्याची एक वेळ निश्चित करा. त्यापूर्वी सोशल मीडिया, टीव्ही, मोबईलचा वापर करणे टाळा.- पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे तसेच गरम पाण्याने आंघोळ करा.- झोपण्यापुर्वी किमान 30 मिनिटे आधी सर्व काम संपवा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.- झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करा. तुमच्या बेडरुममधील लाईट बंद करुन शांत आणि चांगल्या झोपेसाठी वातावरण निर्मिती करा.- झोपण्यापुर्वी व्यायाम करणे टाळावे.दिवसभरात किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. वेगाने चालणे,जॉगिंग करणे किंवा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करा.- रात्रीच्या वेळी कॅफिनयुक्त पेयांचा वापर करणे टाळा.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल