मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST2021-09-17T04:15:22+5:302021-09-17T04:15:22+5:30

चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा देहूगाव : ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’, असा सूचक इशारा भाजपचे ...

Don't call me a former minister, I will know in two-three days | मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल

चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा

देहूगाव : ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहूगाव येथील एका खासगी कार्यक्रमात दिला. या विधानामुळे राज्याच्या राजकीय सत्ताकारणात काहीतरी मोठ्या घडामोडीचे संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात गुरुवारी दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.

देहूगाव येथे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील गुरुवारी आले होते. यावेळी झालेल्या खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सुहास गोलांडे, बाळासाहेब काळोखे, स्वप्निल काळोखे उपस्थित होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालक वारंवार माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा उल्लेख करत होते. तेव्हा पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल, असे विधान केले. पाटील यांच्या विधानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या राजकारणात बदलाविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

फोटो - चंद्रकांत पाटील

Web Title: Don't call me a former minister, I will know in two-three days