शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार; पुरातन काळापासून प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:44 IST

या व्यवहारामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, दिवसेंदिवस खरेदी-विक्री कमी होऊ लागली आहे.

जेजुरी : पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात गुजरात (काठेवाड), राजस्थान व महाराष्ट्र (गावठी), आदी १५०० हून अधिक विविध प्रकारच्या जातींची गाढवे दाखल झाली आहेत. दरम्यान, बाजारात खरेदी-विक्रीतून दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे.

श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत पौष पोर्णिमेनिमित्त पुरातन काळापासून गाढवांचा बाजार भरतो. यामध्ये माती वडार, गाडी वडार, मदारी, गारुडी, माकडवाले, कैकाडी, परीट, बेलदार, वडार, कुंभार, आदी समाजबांधव राज्याच्या विविध प्रांतांतून दाखल होत गाढवे खरेदी करतात. या व्यवहारामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, दिवसेंदिवस खरेदी-विक्री कमी होऊ लागली आहे. जेजुरीत गाढवांच्या पारंपरिक बाजारात काठेवाड, गावठी आणि विविध प्रकारची हजारो गाढवे दाखल होत असतात.दातांवरून गाढवाचे वय ठरवले जाते. चार दात असलेल्या पशूला ‘चौवान,’ तर दोन दात असलेल्यास ‘दुवान’ म्हटले जाते. अक्कर म्हणजे ज्याला दात आलेले नाहीत असे छोटे पशू, यांना त्या मानाने किंमत कमी मिळते. काठेवाड (गुजरात) पशूची किंमत ५० ते ७० हजार रुपये; तर महाराष्ट्रीय गावठी पशूची किंमत २० ते ३५ हजार रुपये मिळत आहे. याबाबत कंधार (जि. नांदेड) येथून गाढवे खरेदीसाठी आलेले किसन गोविंद तेलंगे यांनी सांगितले की, यंदा पशूंच्या किमती आवाक्याबाहेर असून, नर कमी आणि मादी पशू विक्रीसाठी आलेल्या आहेत. काठेवाडी गाढव हे उंच, कणखर, ओझी वाहण्यासाठी मजबूत असल्याने त्यांची किंमत जास्त असल्याचे कोल्हार (जि. अहिल्यादेवीनगर) येथून आलेल्या दत्तू जाधव यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आंध्र राज्यातील काही व्यापारी मांसविक्रीसाठी गाढवे खरेदी करण्यास येत होते. मात्र आम्ही संघटित होऊन त्यांना विरोध केल्याने ते आता फिरकत नसल्याचे सुभाष गायकवाड यांनी सांगितले. 

पौष पौर्णिमा उत्सव व येथील बाजाराला मोठी परंपरा आहे. कायमस्वरूपी जागा राखीव ठेवावी व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. १३) नामदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे.  - रामा यल्लप्पा काळे, येडशी, जि. धाराशिव

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रJejuriजेजुरीMarketबाजार