डोणजेत एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:39+5:302020-12-25T04:09:39+5:30

रुईत पती-पत्नीस मारहाण वालचंदनगर : चंदनाचे झाड तोडल्याच्या कारणावरून दोघा पती पत्नाींना त्यांच्या घरात घसुन तिघांनी मारहाण केली. ...

Donjeet beat one | डोणजेत एकाला मारहाण

डोणजेत एकाला मारहाण

रुईत पती-पत्नीस मारहाण

वालचंदनगर : चंदनाचे झाड तोडल्याच्या कारणावरून दोघा पती पत्नाींना त्यांच्या घरात घसुन तिघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ही घटना याप्रकरणी कांतीलाल निवृत्ती जगताप, संगीता कांतीलाल जगताप, प्रदीप कांतीलाल जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर गुरुनाथ नवनाथ जगताप यांनी वालचंद नगर पोलिसात फिर्याद दिली.

--

शेतीच्या वादातून सासू सुनेला मारहाण

दौंड : शेतजमिनीच्या वादाताून येवले वस्ती येथील शेतामध्ये तिघांनी मिळून सासू-सुनेला मारहाण केली. ही घटना मौज मलठण (ता. दौंड) येथे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी देविदास बाबा येवले, मंगल देविदास येवले, अविनाश देविदास येवल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सविता अंबादास येवले यांनी फिर्याद दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

--

पूर्ववैमन्यासातून महिलेकडून तिघांना मारहाण

घोडेगाव : शेतीच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणातून एका महिलेने तिचे नातेवाईकाला व त्याच्या पत्नी मुलीला मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास गोहे खुर्द एसटी स्थानकावर घडली. याप्रकरणी मालती महादेव गभाले या महिलेवर गुन्हा दाखल झाला. सीताराम सागाजी गभाले यांनी याबाबत घोडेगाव पोलिस टाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

--

रुग्णालयातून ४१ हजार रुपयांची चोरी

--

नारायणगाव : नारायणगाव येथील डॉ. डोळे हॉस्पिटल येथील लाॅकरमध्ये ठेवलेली ४१ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मुकुंद नारायण पुरानिक यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Donjeet beat one