फडके यांच्या पाठशाळेला गोधन दान
By Admin | Updated: June 30, 2015 22:58 IST2015-06-30T22:58:00+5:302015-06-30T22:58:00+5:30
पुणे येथील व्यापारी श्रीराम परतानी यांनी आपली लाडकी कन्या व जावयाला गोधन आंदण म्हणून दिले. परंतु, याच परंपरेत वाढलेल्या या लाडक्या कन्येने हे गोधन अधिक

फडके यांच्या पाठशाळेला गोधन दान
आळंदी : पुणे येथील व्यापारी श्रीराम परतानी यांनी आपली लाडकी कन्या व जावयाला गोधन आंदण म्हणून दिले. परंतु, याच परंपरेत वाढलेल्या या लाडक्या कन्येने हे गोधन अधिक मासातील दानाचे महत्त्व विचारात घेऊन आळंदी येथील वसंत फडके यांच्या नृसिंह सरस्वती पाठशाळेला दान करून पुण्य मिळवले.
श्रीराम परतानी व ज्येष्ठ उद्योजक गणेश सारडा यांनी आळंदी येथे आयोजित केलेल्या संकीर्तन महोत्सवाच्या पाचव्या दिवशी विविध कार्यक्रम झाले.
गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद पुराणात सर्वत्र गोमातेचे महत्त्व विशद करण्यात आलेले आहे. गोमातेचे शेण, गोमूत्र व तिचे खाद्य यातून जैविक अन्नाची निर्मिती करणे शक्य असून, त्याचे कोणतेच दुष्परिणाम जाणवत नसल्याची माहिती पुणे येथील प्रसिद्ध औषधविक्रेते जयेश कासट यांनी दिली, तर श्रीराम भागवत कथेतील दृष्टांत श्रीराम परतानी यांनी दिले.
श्रीराम परतानी यांचे परमगुरू दिनकर महाराज आंचवले यांच्या हस्ते सोमवारी म्हणजेच एकादशी दिवशी गोधनदानाचा कार्यक्रम झाला. या वेळी स्वामी गोविंदगिरीजी महाराज, हभप चैतन्यमहाराज देगलूरकर, वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज, हभप दिनकरमहाराज आंचवले, कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम परतानी, गणेश सारडा व जयप्रकाश सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सद्गुरू संकीर्तन महोत्सव आळंदी येथे दि. २६ जूनपासून आळंदी येथे सुरू असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. भाविकांसाठी मोफत भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे गणेश सारडा यांनी सांगितले. (वार्ताहर)