शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणीनगर येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:41 IST

दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट

ठळक मुद्देदोन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

विमाननगर : कल्याणीनगर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी फोडून लुटणाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपी फरारच आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कल्याणीनगर मित्र मंडळ व परिसरातील नागरिकांनी केली आहे. कल्याणीनगर येथील गणपती मंदिराच्या आवारातील साईबाबा मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली.या प्रकरणी मंदिर समितीचे सदस्य राहूल निगडे यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार लक्षात आला. तात्काळ येरवडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी मंदिराची खिडकीची काच फोडून चोरट्यांनी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास गाभार्यात प्रवेश केला. सर्वप्रथम आतील बाजूस असणार्या सीसीटिव्हीच्या वायरी तोडल्या.त्यानतंर दानपेटीची बिजागरी उचकून आतील दानरूपी जमा असलेली अंदाजे पस्तीस हजार रुपये रोख रक्कम दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली. चोरी करून अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी बाहेर पडताना बाहेरील सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. कल्याणीनगर सारख्या ठिकाणी मंदिराच्या आवारातून दानपेटी फोडून चोरीच्या घटनेने परिसरात  खळबळ निर्माण झाली आहे.घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.  येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या वतीने देखील दाखल गुन्ह्याचा तपास सुरु आहे. कल्याणीनगर गणपती मंदिराचे अध्यक्ष रमेश कांबळे म्हणाले,कल्याणीनगर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना गंभीर आहे.मंदिराच्या संपूर्ण परिसर सीसीटिव्ही कॅमेरे  लावलेले आहेत.हा गंभीर गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केलेला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी यावेळी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर