रक्तदान करणे ही काळाची गरज : गौरी गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST2021-03-13T04:20:59+5:302021-03-13T04:20:59+5:30
कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथील जिझस लव्हज फेलोशिप चर्चच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे ...

रक्तदान करणे ही काळाची गरज : गौरी गायकवाड
कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथील जिझस लव्हज फेलोशिप चर्चच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रसंगी गौरी गायकवाड बोलत होत्या. यावेळी माजी सरपंच नंदू काळभोर, युवा नेते चित्तरंजन गायकवाड, पोलीस पाटील प्रियंका भिसे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गौरव काळभोर, डॉ. रतन काळभोर, चर्चचे पास्टर जोसेफ पवार, अध्यक्ष डॅनियल पवार, काळे, हेन्री राॅबर्टसन, डॅनियल साळवी, सतीश भुजंग आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात या चर्च मार्फत विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. अन्नदान, नागरिकांना सॅनिटायजर व मास्क यांचे वाटप व करोना योध्यांचा सन्मान आदी उपक्रम चर्चच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. या कामाबद्दल गौरी गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने चर्चचे आभार मानले.