शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

दाेन किडनी, यकृताचे दान; अवयवदानाने वाचवले तीन जणांचे प्राण

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: January 28, 2024 18:05 IST

भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्न केले

पुणे : एकीकडे देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हाेत असताना दुसरीकडे तीन रुग्णांना आरोग्याची स्वसत्ता मिळवून देण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते आणि त्याला यश आले. भारती हॉस्पिटल येथे ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन डेड झाला. त्याच्या कुटूंबियाने अवयव दानाला परवानगी दिल्याने दाेन किडनी आणि यकृत असे अवयव मिळाल्याने तीन जणांचे जीव वाचले. भारती हॉस्पिटल वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे, आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाची टीम यांनी ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. एम.व्ही. परमेश्वरन व भरत पंजाबी यांनी कुटुंबास मानसिक आधार दिला. नातेवाईकही अवयवदानस तयार झाले. त्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डीनेशन सेंटरच्या आरती गोखले यांनी ईतर हॉस्पिटल बरोबर समन्वय साधून अवयव दिले.

 त्यानुसार एक किडनी भारती हॉस्पिटल येथील रुग्णास देण्यात आली. दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे देण्यात आली. लिव्हर म्हणजे यकृत ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे देण्यात आले. तर डोळ्यातील कॉर्निया भारती हॉस्पिटल आय बँकेत ठेवण्यात आला आहे. मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपाने ती व्यक्ती जीवंत राहणार असून यथावकाश कॉर्निया वापरल्यावर त्या डोळ्यातून एखादा अंध जग पाहू शकणार आहे.  

भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, उपवैदयकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांचे मार्गदर्शन मिळाले. भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्न केले. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यOrgan donationअवयव दानhospitalहॉस्पिटलSocialसामाजिकdoctorडॉक्टर