पुण्याहून देशांतर्गत विमानांची उड्डाणे वाढली, दिल्लीसाठी सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:15+5:302021-09-06T04:15:15+5:30
पुणे: कोरोनाच्या काळात 'जमिनीवर' आलेली विमनासेवा आता पुन्हा 'हवेत' झेपावली आहे. सप्टेंबर महिन्यापासून पुणे विमानतळावरून देशांतर्गत विमानांची उड्डाणे वाढली ...

पुण्याहून देशांतर्गत विमानांची उड्डाणे वाढली, दिल्लीसाठी सर्वाधिक
पुणे: कोरोनाच्या काळात 'जमिनीवर' आलेली विमनासेवा आता पुन्हा 'हवेत' झेपावली आहे. सप्टेंबर महिन्यापासून पुणे विमानतळावरून देशांतर्गत विमानांची उड्डाणे वाढली आहे. विशेषतः दिल्लीसाठी होत असलेल्या उड्डाणात वाढ झाली आहे. पूर्वी दिवसा दिल्लीसाठी सरासरी ८ ते १० होणारी उड्डाणे आता सरासरी १३ ते १४ होत आहे. तसेच, येत्या काळात पुणे विमानतळावरून आणखी शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. त्या संदर्भात विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या स्तरावर कामे देखील सुरू केली आहेत. त्यामुळे पुण्याची नव्या शहरांसाठी कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.
जुलै, ऑगस्ट महिन्यात पुणे विमानतळावरून दिवसाला सरासरी ३५ ते ४० विमानांची वाहतूक होत असे. त्यात आता वाढ झाली आहे. सप्टेंबरपासून लक्षणीय वाढ झाली आहे. येणारा काळ उत्सवाचा काळ आहे. त्यासाठी विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी देखील आतापासून नियोजन सुरु केले आहे. सद्य:स्थितीत एका दिवसात सरासरी ५० ते ५५ विमानाची वाहतूक होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बॉक्स १
दिल्लीला प्रतिसाद अधिक :
पुणे विमानातळावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानांना सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. यात थेट दिल्लीला जाणारे व काही विमाने पुणे विमानतळावर थांबून पुढे जाणाऱ्या विमानांचा देखील समावेश आहे. दिल्लीनंतर बंगळुरू, चेन्नई व नागपूर शहरासाठी प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक आहे. पुणे विमानतळावर आता रोज १२ ते १३ हजार प्रवाशांची वाहतूक होत आहे.
---------------------
गेल्या काही दिवसांत पुणे विमानळावरील विमानांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, प्रवासी संख्येतही वाढ होत आहे. मागच्या वर्षात कोरोनामुळे हवाई क्षेत्रात मरगळ आली होती. पण आता चांगले संकेत मिळत आहे. येणाऱ्या काळात विमानांच्या संख्येत आणखी वाढ होईल. -
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानातळ