डॉल्बीच्या दणदणाटाने वाढले ध्वनिप्रदूषण
By Admin | Updated: September 30, 2015 01:10 IST2015-09-30T01:10:42+5:302015-09-30T01:10:42+5:30
शहरात यंदाही ढोल-ताशा समवेत डॉल्बीचा दणदणाट सुरूच होता. गतवर्षीच्या तुलनेपेक्षाही यंदा ध्वनिप्रदूषण पातळीत ३ डेसिबलने वाढ झाली आहे.

डॉल्बीच्या दणदणाटाने वाढले ध्वनिप्रदूषण
पिंपरी : शहरात यंदाही ढोल-ताशा समवेत डॉल्बीचा दणदणाट सुरूच होता. गतवर्षीच्या तुलनेपेक्षाही यंदा ध्वनिप्रदूषण पातळीत ३ डेसिबलने वाढ झाली आहे.
खडकी, थेरगाव, डांगे चौक, नवी सांगवीतील कृष्णा चौक, चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीतील शांतीनगर, भोसरी गावठाण या भागात ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत मर्यादेपेक्षा जास्त वाढ दिसून आली. शहरात १७ सप्टेंबरपासून ध्वनिप्रदूषण पातळीचे मोजमाप घेण्यात आले. ध्वनी मोजमाप सर्वेक्षणात सातव्या व अकराव्या दिवशी प्रदूषणात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.
गणेश प्रतिष्ठापनेदिवशी ८० डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादेची उंची गाठली आहे, तर विसर्जनादिवशी ९७ डेसिबलपर्यंत मर्यादेचे उल्लंघन केले आहे. १७ सप्टेंबरदिवशी चापेकर चौकात ८० डेसिबलची उंची गाठली आहे, तर शांतीनगर चौकात ७९.८ डेसिबलची मर्यादा गाठली आहे. भोसरी गावठाणात ७६.२ डेसिबलची मर्यादा ओलांडली आहे. (प्रतिनिधी)