शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कुत्र्यांच्या गळ्यात लसीकरणाचा पट्टा : डॉ.अंजली साबणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 7:25 PM

गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते.

ठळक मुद्देशहरामध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या, प्रभागनिहाय मोहीम राबविणारटीकेची झोड उडाल्यानंतर आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन भटक्या कुत्र्यांसाठी लवकरच संगोपन केंद्र

पुणे: शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, यावर योग्य उपाय-योजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने या कुत्र्यांना निबिर्जीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण करण्यासाठी प्रभागनिहाय  मोहीम सुरू करण्यात आली आहे.  त्यानुसार आता पर्यंत ५४४ कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, या कुत्र्यांच्या गळ्यात विविध रंगांचे पट्टे बांधण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांचा त्रास देखील प्रचंड वाढला आहे. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याची संख्या तर खूपच वाढली आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते. याबाबत महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उडाल्यानंतर आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन केले आहे. याबाबत डॉ.साबणे म्हणाले, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ब्ल्यू क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि त्यांना अँटी रेबिज लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणा-या प्रभागांमध्ये कारवाईसाठी प्रत्येकी दहा दिवसांचे नियोजन तयार करून तशी पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५४४ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबिजची लस देण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. -------------------भटक्या कुत्र्यांसाठी लवकरच संगोपन केंद्रशहरामध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. यामध्ये अनेक कुत्री अपघातात जखमी होतात. अनेक प्रकारचे आजार होतात अशा कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच स्वतंत्र संगोपन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी जागा निश्चित करुन हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. - डॉ.अंजली साबणे, महापालिका आरोग्य अधिकारी

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका