मालकाला वाचविण्यासाठी कुत्र्यांनी केला बिबट्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST2021-02-20T04:29:30+5:302021-02-20T04:29:30+5:30

परिंचे : वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कुत्रा मालकाचे प्राण वाचवतो असे तुम्ही ऐकले असेल मात्र पुरंदर तालुक्यातील मांढर ...

Dogs attack leopard to save owner | मालकाला वाचविण्यासाठी कुत्र्यांनी केला बिबट्यावर हल्ला

मालकाला वाचविण्यासाठी कुत्र्यांनी केला बिबट्यावर हल्ला

परिंचे : वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कुत्रा मालकाचे प्राण वाचवतो असे तुम्ही ऐकले असेल मात्र पुरंदर तालुक्यातील मांढर गावानजीकच्या शिंदेवाडीत घडली.

या परिसरातील शेतकरी विश्वास शंकर पापळ हे त्यांच्या शेतात निघाले होते. त्यावेळी झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने विश्वास यांच्यावर उडी मारली व डोक्याला ओरखडले पापळ यांनी त्याच्या हल्ला परतविण्यासाठी त्याच्याशी झटापट करत आरडाओरड केली. त्यावेळी त्यांच्या शेतातील दोन्ही कुत्रे त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले व बिबट्यावर हल्ला चढविला. दोन्ही कुत्र्यांनी एकदमच हल्ला केल्यामुळे बिबट्या व कुत्र्यांमध्ये काही वेळ झटापट सुरू झाली. मात्र काही वेळात बिबट्याने दोन्ही बहाद्दूर कुत्र्यांसमोर अक्षरश: शेपूट घालून पळ काढला त्यामुळे विश्वास यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या झटापटीत विश्वास यांच्यासह त्यांचे दोन्ही कुत्रे जखमी झाले. विश्वास यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

--

बिबट्याची दहशत

गेल्या आठवड्यात पांगारे येथे बंदिस्त गोठ्यात बांधलेली दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत. पांगारे, हरगुडे, टोणपेवाडी, शिंदेवाडी, मांढर, धनकवडी, दवणेवाडी परिसरात बिबट्याची दहशत असून, अनेक जनावरे बिबट्याच्या हल्लात मरण पावली आहेत.

--

फोटो ओळ : मांढर (ता. पुरंदर) बिबट्याच्या हल्लात जखमी झालेले शेतकरी विश्वास पापळ.

Web Title: Dogs attack leopard to save owner