आठ जणांना कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: January 16, 2015 23:57 IST2015-01-16T23:57:31+5:302015-01-16T23:57:31+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने भोर शहरात धुमाकूळ घातला आहे. त्याने गुरुवारी नागरिकांची चांगलीच तारांबळ केली. या कुत्र्याने ८ जणांना चावा घेतला

आठ जणांना कुत्र्याचा चावा
भोर : पिसाळलेल्या कुत्र्याने भोर शहरात धुमाकूळ घातला आहे. त्याने गुरुवारी नागरिकांची चांगलीच तारांबळ केली. या कुत्र्याने ८ जणांना चावा घेतला. त्यांपैकी दोघांना पुढील उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल केले आहे. गेल्या १५ दिवसांत हे कुत्रे ४७ जणांना चावले आहे. मात्र, त्याचा बंदोबस्त न केल्याने नगरपालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी दुपारी एक वाजता मोकाट कुत्र्याने आतिफ सलीम शेख या मुलाला चावा घेतला. त्यानंतर मंगळवार पेठ, आमराईआळी येथील ८ जणांना ते चावले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होत. यांत सिद्धी रामचंद्र शिंदे (वय ११, रा. बारे ), भारती चंद्रकांत बारटक्के (६३, भोर), आशा विजय कुलकर्णी (६२, भोर), राघू गोविंद कुमकर (६५, महुडे), शुभम ज्ञानेश्वर बोडके (१३, भोर), अथर्व ब्रह्मदेव खाटपे (११, भोर) व सुबोध रावळ (५४, भोर) यांचा समावेश आहे. यातील अर्थव खाटपे व आशा कुलकर्णी यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला पाठविले आहे. (वार्ताहर)