शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रात्रीचाच फिरतो की काय? 'नाईट कर्फ्यू'च्या घोषणेनंतर हॉटेल चालकांचा त्रस्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:29 IST

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत.

पुणे: राज्य सरकारच्या रात्री संचारबंदी लागू करण्याच्या निर्णयावर सगळे हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सगळे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रात आणली आहे अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का असा त्रस्त सवाल ते करत आहेत.

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. सलग ६ महिन्यांच्या बंदीनंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर मागील महिनाभरात व्यवसाय सुरळीत होत होता. त्यानंतर नाताळात चांगला व्यवसाय होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आता सरकारच्या निर्णयाने त्यावरही पाणी पडले आहे असे हॉटेलचालक बोलून दाखवत आहेत.

आता त्यांना रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी आहेच. त्यामुळे त्यांना साडेदहा वाजताच आवराआवर करावी लागत होती. परवानगी रात्री १२ पर्य़त करावी अशी त्यांची मागणी होती. ते तर नाहीच झाले ऊलट ११ नंतर संचारबंदी आल्याने त्यांना आता १० वाजताच सगळे आवरावे लागणार आहे. पुण्यात हॉटेल असोसिएशनचे ३ हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. संघटनांच्या वतीने सरकारपर्यंत ही नाराजी पोहचवण्यात येणार आहे अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. आम्ही त्याविरोधात दाद मागत आहोत. आमची रात्री १२ पर्यंतच्या परवानगीची मागणी सोडून सरकारने हा असा निर्णय घेतल्याने पुन्हा आमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. गणेश शेट्टी: अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन.--------सरकारचे धोरणच लक्षात यायला तयार नाही. कोरोनाचे संकट मोठेच आहे, मात्र त्यावर अशी बंदी वगैरे घालून मार्ग निघणार नाही.किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन-----//सरकारने काहीतरी कारण असल्यामुळेच असा निर्णय घेतला असावा असे आम्ही समजतो. यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. विक्रमराज शेट्टी, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया हॉटेल अँन्ड रेस्टॉरंट असोसिएशन. 

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या