शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचारी साकारणार समाजप्रबोधनपर लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:33 IST

लघुपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार महापालिकेचे कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी तीन लाखांचा निधी मंजूर कर्मचा-यांनी यापूर्वी सन २०१० मध्ये ‘फ्लायओव्हर’ हा लघुपट बनविला

पुणे : महापालिका कर्मचारी व पीएमसी एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने समाज प्रबोधनपर विषयावर लघुपट साकारण्यात येणार आहे. त्या लघुपटासाठी २ लाख ९९ हजार रुपयांचा निधी देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कर्मचा-यांच्या वतीने एकूण ३० मिनिटांचा हा लघुपट असणार आहे.  या लघुपटामध्ये सचिन नावाच्या एका गरीब मुलाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. ज्याचे सचिन तेंडूलकर सारखा क्रिकेटर होण्याचे स्वप्न आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण होते की नाही ते या लघुपटातून मांडण्यात येणार आहे. या लघुपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार महापालिकेचे कर्मचारी आहेत. तसेच बालकलाकार देखील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असणार आहेत. सर्व सेवक या लघुपटाचे काम आपले दैनंदिन काम सांभाळून कार्यालयीन वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी करणार आहेत. महापालिकेच्या जागा ज्या ज्या इमारतीमध्ये लघुपटाचे चित्रीकरण होणार आहे. त्या जागा चित्रीकरणासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.कर्मचा-यांनी यापूर्वी सन २०१० मध्ये ‘फ्लायओव्हर’ हा लघुपट बनविला होता. रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांनी रेल्वे पूलाचा वापर करावा आणि अपघात टाळावेत या सामाजिक विषयावर समाजप्रबोधन करण्यासाठी २२ मिनिटांचा लघुपट केला होता. या लघुपटाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता दुसरा लघुपट करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcinemaसिनेमा