शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी डॉक्टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:19 IST

याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाचे  सर्वच काम ऑनलाइन पद्धतीने होते. वाहन परवाना काढण्यासाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे

बारामती (पुणे): चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एमबीबीएस डॉक्टरांना ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिला जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती बारामती उपप्रादेशिक परीवहन विभागाचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाचे  सर्वच काम ऑनलाइन पद्धतीने होते. वाहन परवाना काढण्यासाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप सुरु करण्यात आलेली नव्हती. आता १ नोव्हेंबरपासून ही सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एमबीबीएस डॉक्टरकडून युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे.

१६ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर बिना गियर दुचाकी तर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती सुदृढ असेपर्यंत  ऑनलाइन परवान्याची सुविधा आरटीओकडून देण्यात आली आहे. तर चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरने लायसन्स काढण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चाळीशीनंतरच्या उमेदवाराला लायसन्स व लायसन्स नुतनीकरण करून दिले जाणार आहे. याच सोबत वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देखील ऑनलाइन आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

एमबीबीएस डिग्री, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे किमान चार फोटोग्राफ, ओळखपत्र (उदा. ईपीक, पॅन आधार, पासपोर्ट) इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येक एमबीबीएस पदवी धारण करणाऱ्या डॉक्टरांना स्वतंत्र युजर आयडी देण्यात येतील. इच्छुक एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मुळ कागदपत्रे तपासणीकरिता कार्यालयात सादर करावे. बारामती आणि इंदापुरच्या काही डॉक्टरांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, दौंड येथील डॉक्टरांचा एकही अर्ज नोंदणीसाठी आलेला नाही. संबंधितांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRto officeआरटीओ ऑफीस