पालिकेला सायकली हव्यात का?

By Admin | Updated: November 28, 2015 00:57 IST2015-11-28T00:57:13+5:302015-11-28T00:57:13+5:30

महापालिका प्रशासनाने ठेवलेला अर्धवट प्रस्ताव आणि पालिका आयुक्तांकडे माहितीची कसलीही विचारणा न करता आयुक्तांनी माहिती दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर

Do you want to have a bicycle? | पालिकेला सायकली हव्यात का?

पालिकेला सायकली हव्यात का?

पुणे : महापालिका प्रशासनाने ठेवलेला अर्धवट प्रस्ताव आणि पालिका आयुक्तांकडे माहितीची कसलीही विचारणा
न करता आयुक्तांनी माहिती दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर न करण्याचे स्थायी समितीने लावून धरलेले पालुपद यांमुळे शहरासाठीचा सर्वंकष सायकल आराखडा गेल्या महिनाभरापासून स्थायी समितीसमोर पडून आहे. विशेष म्हणजे, या आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल १ कोटी १५ लाखांचा खर्च येणार असला, तरी त्यातील ८० टक्के खर्च म्हणजेच ९२ लाख रुपये केंद्र शासन देणार आहे, तर अवघा २० टक्के म्हणजेच २३ लाख रुपयांचा खर्च महापालिकेला उचलावा लागेल.
यामुळे शहरातील तब्बल १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेले १२३ किलोमीटचे अतिक्रमण, कचरा, तसेच तोडफोडीमुळे पडून असलेले सायकल ट्रॅक
प्रत्यक्षात वापरात येणार आहेत.
मात्र, तरीही निधी नसल्याचे कारण सांगून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
महापालिकेने शहरात सायकलींना गतवैभव मिळवून देण्यासाठी सुमारे १०० किलोमीटरहून अधिक अंतराचे सायकल ट्रॅक
उभारलेले आहेत.
शहरात जवळपास प्रमुख रस्त्यांवर हे ट्रॅक विखुरलेले
आहेत. मात्र, केवळ ते एकमेकांशी जोडले गेलेले नसल्याने तसेच
त्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडे कोणत्याही
ठोस योजना अथवा धोरण
नसल्याने हे सायकल ट्रॅक पडून
आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरासाठी
सर्वंकष सायकल आराखडा
तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात
आला. त्या माध्यमातून केंद्राच्या नगर विकास मंत्रालयाने या योजनेसाठी
८० टक्के निधी देण्याची तयारीही दर्शवली होती. त्यानुसार, महापालिकेने नागरिकांकडून
सूचना मागवून त्याचा आराखडा
तयार करण्याचा निर्णय घेतला
आहे.
यासाठी सल्लागाराची निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करण्यात आली असून, त्यासाठी येणाऱ्या सव्वा
कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर १७
आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आला
आहे. (प्रतिनिधी)
सायकल ट्रॅक वापरले जावेत, असे महापालिकेलाच वाटत नाही. त्यामुळे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव थांबला असला, तरी नागरिकांना शहरातील सायकल ट्रॅक वापरण्यासाठी हवे आहेत. पालिकेला ही योजना नको असेल, तर दुसरी तयार करावी; पण आम्हाला सायकल सायकल ट्रॅक मिळावेत. ते वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, अशी आमची भूमिका आहे.
- रणजित गाडगीळ, परिसर संस्था

Web Title: Do you want to have a bicycle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.