शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागो नही, भागो ग्राहक भागो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 00:51 IST

सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे.

पुणे : सेवा पुरविणाऱ्यांकडून होणार ग्राहकांचे शोषण थांबावे आणि फसवणूक झाल्याप्रकरणातून न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास सरसावत आहे. मात्र मंचातील सुनावणीसाठी तक्रारदार गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. तक्रारदार सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रलंबित खटले मंचाकडून निकालात काढण्यात येत आहे.पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात गेल्या तीन महिन्यांत ८४ खटले निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे तब्बल ४४ खटले तक्रारदारांनी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने निकालात काढण्यात आले आहेत. त्यातील ६ प्रकरणांत तर तक्रारदार आणि ज्या सेवा पुरवठादाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तो देखील सातत्याने गैरहजर राहत असल्याने खटला निकाली लागला आहे. ८४ पैकी ९ खटले तक्रार मागे घेतल्याने निकाली निघाले आहेत. तकाही खटल्यांत तक्रारदाराकडे पुरेसे पुरावे नसल्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी सुरू असताना आपला दावा टिकणार नाही याची चाहूल तक्रारदाराला लागते. त्यामुळे ते सुनावणीला हजरच राहत नाही. १९८५ मध्ये संपूर्ण राज्यात ग्राहक मंच सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाची येथे स्थापना करण्यात आली आहे. या ग्राहक मंचात ग्राहकांच्या न्यायासाठी सुनावणी होत असते. वस्तुस्थिती लक्षात घेऊन फसवणूक झाल्या प्रकरणात ग्राहकांना मोबदला, त्यावरचे व्याज ग्राहक मंचात मिळवून दिला जातो. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहक मंच ग्राहकाला मिळवून देत असतो. अलीकडच्या काळात ग्राहक हक्काबाबत जागृत होत आहे. फसवणूक झाल्यास तो ग्राहक मंचात दाद मागत असतो. ग्राहकांनी मंचात दाद मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याबरोबरच दाखल केलेल्या तक्रारदारांनीच दाव्यात गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे.>...या कारणांमुळे तक्रारदार राहताहेत गैरहजरतक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या जाब देणाºयांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये समझोता होतो. अपेक्षित मोबदला मिळाला की तक्रारदार समाधानी होऊन खटल्याकडे दुर्लक्ष करतो.मात्र, याबाबतची माहिती पक्षकारांकडून मंचात देण्यात येत नाही. त्यामुळे तक्रारदार, जाब देणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत.खटला पुण्यात दाखल झाला असेल तक्रारदार परदेशात किंवा दुसºया राज्यात राहण्यासाठी गेला असले तर त्याला सुनावणीला हजर राहणे शक्य होत नाही. तसेच विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाºया वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात.>लवकर तारीख मिळावीखटल्यांचे प्रमाण वाढल्याने प्रकरणाच्या सुनावणीसाठी मोठ्या कालावधीनंतर तारीख दिली जाते. तीनपेक्षा अधिक महिन्यांच्या कालावधीची तारीख मिळाली तर प्रकरण लांबते. त्यामुळे ग्राहकाला त्वरित न्याय मिळत नाही.दाखल केल्यापासून एक वर्षात निकाल लागणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुढील तारीख मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरेजेचे आहे, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप केंजळकर यांनी केली आहे.>अनेकवेळा बाहेरचप्रकरण मिटवले जातेतक्रारदार गैरहजर राहण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे सुनावणीसाठी पुढील तारीख देतात. मात्र, बराच कालावधी तक्रारदार हजर न राहिल्यास, असे दावे मंचाकडून निकालात काढण्यात येतात. साधारणपणे दीड ते दोन वर्षे तक्रारदार हजर न राहिल्यास ग्राहक मंचाकडून, असे पाऊल उचलले जाते. असा प्रकारे दावे निकाली काढल्याची संख्या वाढत आहे. अनेक प्रकरणांत बाहेरच प्रकरण मिटवले जाते. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे.- अ‍ॅड. सुदीप केंजळकर