सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करू नका : कामठे
By Admin | Updated: January 21, 2015 23:09 IST2015-01-21T23:09:17+5:302015-01-21T23:09:17+5:30
जनतेच्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाला सामोरे जाणे काळाची गरज असून सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करु नका,

सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करू नका : कामठे
दौंड : जनतेच्या विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघर्षाला सामोरे जाणे काळाची गरज असून सत्ताधाऱ्यांची दादागिरी सहन करु नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दौंडच्या सहकारभवन येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामठे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले की, येणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकांना कार्यकर्त्यांनी सामोरे जाण्यासाठी ऐकमेकांचे मतभेद विसरणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. अजित बलदोटा म्हणाले की, भविष्यात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही कारण तालुक्यात पुन्हा सुडाचे राजकारण सुरु झाले आहे.
ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार म्हणाले की, दौंड नगर परिषद जनतेच्या भावनांशी खेळत आहे. कारण कुरकुंभ मोरीच्या कामकाजात अडथळा आणण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत आहेत. यावेळी सोहेल खान, नागसेन धेंडे, दौलत ठोंबरे, मिलिंद मोरे, मिलिंद साळवे, बन्सीलाल फडतरे यांची भाषणे झाली. या प्रसंगी रामभाऊ टुले, भिवाजी गरदडे, बादशहा शेख, सत्वशील शितोळे, लक्ष्म दिवेकर, उत्तम आटोळे, रंगनाथ फुलारी, मधुकर दोरगे, राजेश गायकवाड, आबासाहेब वाघमारी, अशोक खळदकर, भाऊसाहेब ढमढेरे, हरेश उध्यवराव फुले, रांभिया, पाराजी हंडाळ, शिवाजी ढमाले, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(वार्ताहर)
वाळूमाफियांचा हैदोस
दौंड तालुक्यात सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली असून वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. दरम्यान आजपावेतो वाळूमाफिया सर्वसामान्यांनावर दादागिरी करत होते मात्र आता वाळूमाफिया पत्रकारांवर दादागिरी करायला लागले ही बाब गंभीर आहे असा प्रश्न बलदोटा यांनी उपस्थित केला.
राज्यात युतीचे सरकार आहे. मात्र, या सरकारने दिलेली आश्वासने ही आश्वासनेच राहतील अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आणि जनतेची वाईट अवस्था या सरकारने केली आहे.
- जालिंदर कामठे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी