शेतकऱ्यांचा आवाज दाबू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:23+5:302020-12-02T04:11:23+5:30
पुणे : शेतीविषयक कायद्यातील दुरूस्तीचा विरोध करण्यासाठी दिल्लीत जमा झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून केल्या जात असलेल्या बळाचा युवक काँग्रेसचे प्रवक्ते ...

शेतकऱ्यांचा आवाज दाबू नका
पुणे : शेतीविषयक कायद्यातील दुरूस्तीचा विरोध करण्यासाठी दिल्लीत जमा झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून केल्या जात असलेल्या बळाचा युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी निषेध केला.
काँग्रेसचा या आंदोलनाला पुर्ण पाठिंबा आहे असे स्पष्ट करून पवार म्हणाले, या मोर्चाच्या आधीच देशातील सर्व कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. देशातील जनतेला आता भाजपाचा खरा चेहरा लक्षात येत आहे, त्यामुळे कोणत्याही बळाचा वापर केला तरी हा आवाज आता वाढतच जाणार आहे हे सरकारने लक्षात घ्यावे.