आश्वासने नकोत, पैसे परत करा

By Admin | Updated: October 29, 2014 00:03 IST2014-10-29T00:03:09+5:302014-10-29T00:03:09+5:30

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर) पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी यापूर्वी आश्वासने दिली आहेत.

Do not promise, pay back | आश्वासने नकोत, पैसे परत करा

आश्वासने नकोत, पैसे परत करा

पुणो : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर) पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी यापूर्वी आश्वासने दिली आहेत. मात्र, ठरलेल्या ताराखांना पैसे परत केले नाहीत. त्यामुळे येत्या 4 दिवसांत थेट 1क्क् टक्के व्याजासह ठेवींच्या रकमा परत कराव्यात.अन्था मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनावर हरकत घेण्यास येईल, असा इशारा रायसोनी ठेवीदार समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला आहे. 
ठाकरे म्हणाले, ‘‘कोथरूड येथे ठेवीदारांना दिलेले पर्याय हे न्याय नाहीत. ठेवींचे पैसे परत मिळतील यासाठी कोणतीही ठोस भूमिका व कायर्वाही संस्था करीत नसल्याचे गेल्या सहा महिन्यापासून दिसून येत आहे. याप्रकारचे पर्याय व आश्वासन रायसोनी यांनी यापूर्वीच जळगाव येथे समन्वय समितीला व मालेगाव येथे ठेवीदारांच्या ठिय्या प्रसंगी लेखी हमीपत्रद्वारे दिले होते. लेखी हमीपत्रत  कबूल करून देखील रायसोनी यांनी ठेवीदारांना दिलेल्या तारखांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे आता आश्वासन नकोचं येत्या 4 दिवसात थेट 1क्क् टक्के व्याजासह ठेवींच्या रकमा परत करा. अन्यथा 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात रायसोनी व इतर 6 संशयितांच्या अटकपूर्व जामीन कायम 
करण्यावर हरकत घेण्यात येवून जामीन नामंजूर करण्यासाठी समिती त्रयस्थ अजर्दार उभा करणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून 35 लाख रुपये अनामत भरायला रायसोनी यांना पैसे आहेत मात्र पैशाअभावी अत्यावश्यक इलाजाशिवाय 
तडफडून मरणावर टेकलेल्या 
बोटावर मोजता येणा-या  रुग्ण ठेवीदारांना पैसे द्यायला संस्था नकार देत आहेत.  
याबाबत पुढील आंदोलन व राज्यभरातील ठेवीदारांची निकड लक्षात घेता समितीची पुढील भूमिका 2 नोव्हेंबर रोजी सारसबाग येथे होण्या-या ठेवीदारांच्या बैठकीत  ठरविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Do not promise, pay back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.