आदिवासींना नक्षलवादी करण्याची योजना राबवू नका : पिचड

By Admin | Updated: August 18, 2014 23:12 IST2014-08-18T23:12:05+5:302014-08-18T23:12:05+5:30

‘‘मी आदिवासी समाजात जन्माला आलो आहे. यामुळे या समाजाच्या हिताचे रक्षण करणो हे माङो आद्यकर्तव्य आहे. आतार्पयत समाजासाठी लढलो.

Do not plan to make tribal people Naxalites: Pichad | आदिवासींना नक्षलवादी करण्याची योजना राबवू नका : पिचड

आदिवासींना नक्षलवादी करण्याची योजना राबवू नका : पिचड

जुन्नर : ‘‘मी आदिवासी समाजात जन्माला आलो आहे. यामुळे या समाजाच्या हिताचे रक्षण करणो हे माङो आद्यकर्तव्य आहे. आतार्पयत समाजासाठी लढलो. आदिवासींच्या अस्मितेसाठी लढलो.  मलाही धमकी येत आहे, तरीही कुठले संरक्षण नको. जर माङया केसाला धक्का लागला तर तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. त्यावेळी मला दोष देऊ नका, असे मी शासनाला ठणकावून सांगितले आहे. आमच्या स्वाभिमानाला धक्का लावू नका. आदिवासींना नक्षलवादी करण्याची योजना राबवू नका’’, असा  इशारा र  आदिवासी विकासमंत्नी मधुकर पिचड यांनी दिला.
जुन्नर येथे  विविध विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार वल्लभ बेनके होते.  पिचड म्हणाले, आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण देऊन मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे आदिवासी समाज आता कुठेतरी विकासाच्या प्रवाहात समाविष्ट होऊ पाहत आहे. आमचा धनगर समाजाच्या आरक्षणास कदापि विरोध नाही. फक्त त्यांना आरक्षण देताना आदिवासींचे नुकसान होऊ नये. मराठा व अन्य समाजाला वेगळे आरक्षण दिले, त्याप्रमाणो धनगर समाजाला हवे तर वेगळे आरक्षण द्या; पण घटनाबाह्य  काम करून गोरगरीब आदिवासींवर अन्याय करू नका.
अध्यक्षपदावरून बोलताना आमदार वल्लभ बेनके म्हणाले, जुन्नर तालुक्यात आदिवासी समाजाचा इतिहास फार मोठा असून, या इतिहासाची उंची वाढविण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आदिवासी बांधवांचा  सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात कोटय़वधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत.
या वेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, नगराध्यक्ष राणी शेळकंदे, तालुकाध्यक्ष शरद लेंडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे, तहसीलदार प्रल्हाद हिरामणी, दादाभाऊ बगाड, उपसभापती अंजना कोरडे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, आंबेगाव पंचायत समिती उपसभापती संजय गवारी, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, शहराध्यक्ष बाबा परदेशी, तालुकाध्यक्ष ज्योत्स्ना झोडगे, शहराध्यक्ष उज्ज्वला शेवाळे, नगरसेवक फिरोज पठाण, मारुती वायाळ, गोविंद साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र तळपे यांनी केले. सूत्नसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी केले तर आभार अशोक लांडे यांनी मानले. (वार्ताहर)
 
घोषणाबाजीमुळे तणाव
तीन दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिल्याचे तीव्र पडसाद आज जुन्नर येथे झालेल्या जाहीर सभेत उमटले. सभेच्या ठिकाणी काही युवकांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस मुर्दाबाद.. शरद पवार मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी युवकांना शांत करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद लेंडे यांच्याही विरोधात या युवकांनी घोषणा दिल्या. मात्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मधुकर पिचड यांच्या वाहनांच्या ताफ्याला पुढे जाण्यास वाट करून दिली.
..तर 109 मतदारसंघांत ताकद दाखवू  
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवून एका समाजाला दुस:या समाजात घुसवून आरक्षण देण्याचा प्रय} करू नका. आदिवासी समाजाचे 24 आमदार व चार खासदार आहेत. राज्यातील 1क्9 मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाची ताकद असून, प्रत्येक ठिकाणी 1क् हजारांहून अधिक मतदार आहेत, हेसुद्धा लक्षात घ्या. आदिवासी समाजावर प्रत्येक वेळी अन्याय होणार असेल तर शांतताप्रिय समाजाला रस्त्यावर येऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे लागेल. तशी वेळ आमच्यावर आणू नका, असे पिचड यांनी सांगितले.

 

Web Title: Do not plan to make tribal people Naxalites: Pichad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.