पाच लाखांवर मालमत्ता कराविना

By Admin | Updated: September 7, 2016 01:54 IST2016-09-07T01:54:44+5:302016-09-07T01:54:44+5:30

शहरातील ५ लाखांपेक्षा अधिक इमारतींना महापालिकेचा करच लावला जात नाही. शहराच्या भोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये अशा सर्वाधिक इमारती असून, त्यातील अनेक इमारतींवर अनधिकृत बार आहेत

Do not own property worth five lakhs | पाच लाखांवर मालमत्ता कराविना

पाच लाखांवर मालमत्ता कराविना

पुणे : शहरातील ५ लाखांपेक्षा अधिक इमारतींना महापालिकेचा करच लावला जात नाही. शहराच्या भोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये अशा सर्वाधिक इमारती असून, त्यातील अनेक इमारतींवर अनधिकृत बार आहेत. पालिकेचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान यात होत आहे. यातील काही इमारतींना राजकीय पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
महापालिकेचे सुमारे ८ लाख ५० हजार करदाते आहेत. त्यांच्याकडून पालिकेने मागील वर्षात १ हजार २०० कोटी रूपये मिळकत कर म्हणून वसूल केले. पालिका प्रशासनाकडून याचा नेहमीच डांगोरा पिटला जातो. मात्र, सुमारे ५ लाख मिळकतींना करच लावला जात नाही. त्या इमारती वास्तवात आहेत, मात्र त्यांची पालिकेच्या दप्तरी नोंदच नाही. त्यातील काही इमारती गेल्या १० वर्षांहून अधिक काळ वापरात आहेत. इतकी वर्षे त्यांना पालिकेकडून पाच पैशांचाही कर लावला गेलेला नाही. काही इमारतींनी त्यांच्या मूळ डिझाईनमध्ये बदल केला. हा बदल फक्त गॅलरी काढणे किंवा ती बंद करणे यापुरताच मर्यादित नाही, तर टेरेसवर परमीट रूम सुरू करण्यापर्यंत आहे. त्यासाठीचा परवाना वगैरे घेतला जातो. मात्र, पालिकेला कर देणे टाळले जाते.
पालिकेच्या मिळकत कर विभागाला या मालमत्तांची माहितीच नाही. माहिती असली तरी त्यांचे क्षेत्रफळ मोजून त्यांना घरपट्टीचे बिल पाठवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच त्यांच्याकडे नाही. या विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी अशा मालमत्ताधारकांसाठी अभय योजना सुरू केली. त्यानुसार ज्यांना कर लावला जात नाही, त्यांनी स्वत:हून पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांच्या मालमत्तेची मोजणी करून त्याला कर लावला जाईल. बदल्यात त्यांना दंड केला जाणार नाही. या योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. ५ लाखांपैकी अवघ्या ५०० जणांनी आतापर्यंत यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता मिळकत कर विभागाने आता अशा मालमत्तांवर बडगा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ सहायक कर आकारणी प्रमुख, २४ विभागीय निरीक्षक, ६० पेठ निरीक्षक यांची स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांना शहराचे विभाग नेमून देण्यात आले आहेत. या विभागाच्या कारवाईत एकएक प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत. कल्याणीनगर येथील सेरेब्रम बिल्डिंगमधील ८व्या मजल्यावर सुरू असलेले दोन विनापरवाना बारच्या मालकांना दंड ठोठावण्यात आला. विमाननगर येथील एका इमारतीच्या ६व्या मजल्यावर रूड नावाचा असा मोठा बार होता. या सर्वांवर ३ पट दंड आकारणी करण्यात आली.
सहायक कर आकारणी प्रमुख वैभव कडलख, चेतन कबाडे तसेच त्यात्या विभागातील पेठ निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली.
 

 

Web Title: Do not own property worth five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.