नव्याना संधी देताना जुन्यांकडे दुर्लक्ष नको
By Admin | Updated: August 22, 2014 00:03 IST2014-08-22T00:03:37+5:302014-08-22T00:03:37+5:30
पक्षाला चांगले दिवस आले आहेत़ पक्षात नव्यांना घेताना, त्यांना उमेदवारी देताना इतकी वर्षे ज्यांनी तळमळीने काम केले अशा जुन्या कार्यकत्र्याकडे दुर्लक्ष करू नका,

नव्याना संधी देताना जुन्यांकडे दुर्लक्ष नको
पुणो : पक्षाला चांगले दिवस आले आहेत़ पक्षात नव्यांना घेताना, त्यांना उमेदवारी देताना इतकी वर्षे ज्यांनी तळमळीने काम केले अशा जुन्या कार्यकत्र्याकडे दुर्लक्ष करू नका, अशा भावना भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र मंडलप्रमुखांनी व्यक्त केल्या़
भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील मंडलप्रमुखांच्या बैठकीचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या वेळी पक्षाचे अखिल भारतीय संघटनमंत्री व्ही़ सतीश, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, प्रदेश निवडणूक व्यवस्थापन प्रमुख श्रीकांत भारती, प्रवक्ते माधव भंडारी, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक योगेश गोगावले, रवी अनासपुरे यांनी मार्गदर्शन केल़े
या वेळी व्ही़ सतीश यांनी कार्यकत्र्याच्या सूचना जाणून घेतल्या़ पक्षाला सत्ता मिळणार, असे दिसताच इतर पक्षांतून अनेक जण भाजपात येतात़ नंतर निघून जातात, असा पूर्वानुभव आह़े विनाअट प्रवेश करतील, त्यांनाच प्रवेश द्या़ बाहेरचा उमेदवार लादू नका़ लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षातील कार्यकत्र्याशी संपर्कातील उणिवा दूर करा़ उमेदवार लवकर जाहीर केला, तर लोकांर्पयत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. या बैठकीत संघटनात्मक रचना जाहीर करण्यात आल्या़ प्रत्येक मतदारसंघात 18 -18 जणांचे मंडळ स्थापन करण्यात आल़े निवडणूक प्रमुख, विस्तारक, प्रचारप्रमुख, सभा दौरा, पथनाटय़प्रमुख अशा विविध समित्यांच्या नेमणुका करण्यात आल्या़ प्रत्येक बूथमध्ये 1क्क् कार्यकर्ते असायला हवेत. केवळ भाजपाचा नाही, तर घटक पक्षांचाही तेवढय़ाच हिरीरीने प्रचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या़ सोशल मीडिया वापर यावर श्रीकांत भारती यांनी मार्गदर्शन केल़े प्रत्येक मतदारसंघाचा तुम्ही जाहीरनामा तयार करा, अशी सूचना माधव भंडारी यांनी केली़ (प्रतिनिधी)
4जो उमेदवारीची अट लादून येण्याचा प्रय} करेल, त्यांचा विचार आम्ही करणार नाही. कोणतीही अट न घालता येणा:यांना प्रवेश दिला जाईल, आम्ही जे निकष ठरवू, त्याच्या आधारे प्रवेश दिले जातील, असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरूवारी सांगितले.
4आमदार विनायक निम्हण
यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता, भंडारी यांनी या चर्चा पक्षाबाहेर सुरू आहेत. कोण नेते येणार आहेत ते माहिती नाही, असे सांगत नावे जाहीर करण्यास नकार दिला. सध्या व्यक्तीनिहाय चर्चा सुरू असून, मुंबईत याविषयी निर्णय होईल, असेही भंडारी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
4भाजपात प्रवेश सुरू झालेले नाहीत. मध्यम पातळीवरील कार्यकत्र्याना प्रवेश दिले, पण मोठय़ा पातळीवरचे प्रवेश दिलेले नाहीत. त्याबाबतचे धोरण ठरेल व त्यानुसार प्रवेश निश्चित होईल. सरसकट येणा:या प्रत्येकाला प्रवेश दिला जाईल असे नाही, असे भंडारी यांनी सांगितले.
4ज्याचे कॅप्टन नरेंद्र मोदी आहेत ते जहाज कधी बुडणार नाही. प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष आपल्या हिताचे पाऊल उचलते. त्यांनी आमच्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दांत भंडारी यांनी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केलेल्या वक्त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.