कारखान्यावर पाऊल ठेवू नका
By Admin | Updated: March 22, 2015 23:04 IST2015-03-22T23:04:27+5:302015-03-22T23:04:27+5:30
अजित पवार तुम्ही कारखान्याचे सभासद नाही त्यामुळे कारखान्यावर पाऊल ठेऊ नये तुम्हाला तो अधिकार नाही

कारखान्यावर पाऊल ठेवू नका
सोमेश्वरनगर : अजित पवार तुम्ही कारखान्याचे सभासद नाही त्यामुळे कारखान्यावर पाऊल ठेऊ नये तुम्हाला तो अधिकार नाही. कारखाना बिनविरोध करायचा असेल तर कारखान्यावरील ३१९ कोटी कर्ज भरा, शिक्षण संस्था कारखान्याच्या ताब्यात द्या. मी माझ्याकडचे काकडे कॉलेज २४ तासात कारखान्याकडे देतो, असे आव्हान शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी दिले.
निंबुत (ता. बारामती) येथे शेतकरी कृती समिती पुरस्कृत सोमेश्वर जनशक्ती पॅनेलच्या प्राचाराचा नारळ फोडताना काकडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूकाका जगताप होते. यावेळी सोपानकाका बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, दिलीप खैरे, नंदकुमार शिंदे, दिग्वीजय जगताप, प्रविण जगताप, जगन्नाथ तावरे आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी संजय जगताप यांचे भाषण झाले. कार्यक्रमात दिलीप खैरे, सौरभ काकडे, राहुल खोमणे, सुशांत सोरटे, भाऊसाहेब भोसले, रमणिक कोठाडीया यांनी मनोगते व्यकत केली. सभेत मदन काकडे पक्षासाठी यांनी अर्थिक मदतीचे आवाहन केले. सूत्रसंचालन मदन काकडे यांनी केले. तर आभार कल्याण भगत यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)
नेते मंडळीनी सहकाराची वाट लावली. यांनी तयार केलेली ९७ वी घटना दुरूस्तीमधील कायदे भंयकर असून हे सहकार संपविण्याचे कारस्थान आहे. माजी मंत्री पवार म्हणतात ५ वर्ष सत्ता द्या. कर्ज फेडले नाही, तर विधासभेला उभा राहणार नाही. विधानसभा आणि कारखान्याचा काय संबंध, ९२ साली कारखान्यावर कर्ज होते पण आतासारखा भष्टाचार नव्हता. त्यावेळी साखर गोदामामध्ये पडून होती. साखरेच्या पोत्यावर उचल देणारी बँक ही पवारांच्या ताब्यात होती त्यामुळे पोत्यावर कर्ज वेळेत न मिळाल्याने कामागरांचे आणि सभासदांची देणी थकली, हे कटू सत्य आहे. त्याची शिक्षा आता आम्ही २० वर्ष भोगलीय. कर्ज व भष्ट्राचार मान्य केला. पक्षाच्या अधिवेशनाला कारखान्याच्या गाडया, गडी आणि पैसा वापरला जातो. ते या कारखान्याचे सभासद नाहीत. तुमचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही कारखान्यावर पाऊल ठेऊ नये.
- सतीश काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते