उघड्यावर शौचास जात नाही!
By Admin | Updated: January 25, 2017 01:40 IST2017-01-25T01:40:34+5:302017-01-25T01:40:34+5:30
शौचालयाचा वापर करीत असल्याचा ग्रामसभेच्या ठरावासह ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला

उघड्यावर शौचास जात नाही!
दौंड : शौचालयाचा वापर करीत असल्याचा ग्रामसभेच्या ठरावासह ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोडणे बंधनकारक असल्याची माहिती दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली.
उमेदवाराला स्वच्छतागृहाचा वापर करणे बंधनकारक आहे. परिणामी घरात स्वच्छतागृह असूनदेखील संबंधित उमेदवार उघड्यावर शौचास जात असेल तर तो निवडणुकीत अपात्र ठरु शकतो. उमेदवारी अर्ज दाखल करणारा उमेदवार स्वत:च्या घरात किंवा परिसरात असलेलेल्या स्वच्छतागृहाचा नियमित वापर करीत आहे. याचा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थांनी द्यायचा आहे.
उमेदवार हा नियमितपणे स्वच्छतागृहाचा वापर करत नसेल हे ग्रामसभेच्या निदर्शनास आल्यास त्याला मात्र निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यासाठी तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २६ जानेवारीदरम्यान ग्रामसभा होणार आहे. (वार्ताहर)