शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल, रुग्णालयांना सवलती देऊ नये

By Admin | Updated: November 26, 2014 23:48 IST2014-11-26T23:48:07+5:302014-11-26T23:48:07+5:30

शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल व रुग्णालयांच्या इमारतीतील जिने, लिफ्ट, पॅसेज व लॉबीच्या प्रीमीयम आकारणीत सवलत दिल्यास महापालिकेच्या महसुलात घट होणार आहे.

Do not give discounts to five star hotels and hospitals in the city | शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल, रुग्णालयांना सवलती देऊ नये

शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल, रुग्णालयांना सवलती देऊ नये

पुणो : शहरातील फाइव्ह स्टार हॉटेल व रुग्णालयांच्या इमारतीतील जिने, लिफ्ट, पॅसेज व लॉबीच्या प्रीमीयम आकारणीत सवलत दिल्यास महापालिकेच्या महसुलात घट होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीमधील फाइव्ह स्टार हॉटेल व रुग्णालयांना सवलती देण्याचा प्रस्तावाला मंजुरी देणो उचित ठरणार नाही, असा स्पष्ट नकार देणारा अभिप्राय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 
दिला आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेने शहरातील काही प्रथितयश हॉस्पिटलला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) खैरात केली. त्याबदल्यात संबंधित हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना 1क् टक्के खाटा राखीव ठेवणो अपेक्षित होते. परंतु, रुबी, सह्याद्री, औंध व इनलॅक्स हॉस्पिटलला ही सवलत असूनही त्या ठिकाणी गरीब रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या तीन वर्षात महापालिकेने दिलेल्या सवलतीच्या बदल्यात संबंधित हॉस्पिटलने 1क् टक्केप्रमाणो 3क् हजार गरीब रुग्णांवर उपचार करणो अपेक्षित होते. प्रत्यक्षात 15क् रुग्णांवर उपचार झाल्याचा गंभीर प्रकार माहिती अधिकारातून पुढे आला आहे. त्यानंतरही महापालिकेने प्रस्तावित फाइव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटलला प्रीमियम आकारणीत सवलत देण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी ऐनवेळी स्थायी समितीपुढे गुपचूप 11 नोव्हेंबरला दाखल केला होता. स्थायी समितीने या प्रस्तावावर आयुक्तांचा अभिप्राय मागविला होता. त्याविषयीचे सर्वात प्रथम वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला होता. 
शहरातील काही नव्याने प्रस्तावित फाइव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटल डोळ्यांपुढे ठेवून सवलतीचा प्रस्ताव दाखल झाल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मंगळवारी अभिप्राय दाखल केला. फाईव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटलला रेडिरेकनरऐवजी पूर्वीच्या 1999 च्या परिपत्रकानुसार प्रीमियम आकारणीची सवलत देण्याचा प्रस्तावात म्हटले आहे. मात्र, सद्यस्थितीत महापालिकेच्या वार्षिक महसुलाच्या 25 टक्के उत्पन्न बांधकाम शुल्क व प्रीमियम आकारणीतून मिळतो. त्यामध्ये 86 टक्के इतकी रक्कम प्रीमियममधून मिळते. मात्र, प्रस्तावाप्रमाणो आकारणी केल्यास प्रीमियमची आकारणी थेट निम्म्यावर येणार आहे. अगोदरच बांधकाम क्षेत्रत मंदी आहे. त्यामुळे फाइव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटलला प्रीमियम आकारणीमध्ये सवलत देणो उचित ठरणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नात घट होईल, असा स्पष्ट अभिप्राय प्रशासनाने दिला
आहे.(प्रतिनिधी)
 
हॉटेल-हॉस्पिटलच्या ‘फाइव्ह स्टार’ सवलतीच्या ‘लोकमत’च्या बातमीमुळे सर्व नगरसेवकांना हा प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती मिळाली. परंतु, एका बाजूला प्रथितयश हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली जाते; तरीही त्यांना सवलती देण्याचा प्रस्ताव येतो. मात्र, गोरगरीब रुग्णांवर सवलतीत उपचार करणा:या छोटय़ा रुग्णालयांना महापालिका सवलती देऊ शकत नाही, हा गंभीर प्रकार आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, गटनेते, रिपब्लिकन पक्ष

 

Web Title: Do not give discounts to five star hotels and hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.