शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अपप्रवृत्तींना बळी पडू नये : डॉ. सदानंद मोरे; पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:47 IST

ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव उद्घाटन समारंभवारकरी संप्रदायाची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ : डॉ. सदानंद मोरे

पुणे : अलीकडच्या काळात समाजात जातिभेद वाढला आहे. लोक संतांच्यादेखील जाती पाहायला लागले आहेत. राजकीय चळवळी करण्यासाठी बाहेरील लोक अशा अपप्रवृत्ती पसरवत आहेत. अपप्रवृत्तींना संप्रदायातील लोकांनी बळी पडू नये. संतांची शिकवण ही महाराष्ट्राच्या सामाजिकतेला आधारभूत असे ऐक्य आहे. त्यामुळे हे ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. श्री ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्ट व श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी वारकरी भजनी मालिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी वाचन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पानसरे, बाळासाहेब सातपुते, तुकाराम रासने, श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाचे अध्यक्ष रमेश मेहेर, शाहीर हेमंत मावळे, संदीप लचके, मुकुंद भेलके, अ‍ॅड. ज्ञानेश्वर पाटसकर, प्रशांत भोंडवे, अखिल झांजले, सुनील रासने, श्रीकांत कारंजकर, प्रसाद पानसरे, संतोष डापसे या वेळी उपस्थित होते. या वेळी नलूताई कासार यांचा सन्मान करण्यात आला. कृष्णा पानसरे म्हणाले, ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या सामुदायिक पारायण सोहळ्याची सुरुवात शनिवारवाड्यातील बटाट्या मारुती मंदिरात झाली होती. या पारायण सोहळ्यात खंड पडू न देता रासने परिवाराने ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. त्यामुळे भाविकांना त्याचा आजही लाभ मिळत आहे.’संदीप लचके यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब सातपुते यांनी प्रास्ताविक केले. 

वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या आधीपासून चालत आलेला संप्रदाय आहे. या संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आणि त्याची उपासना म्हणजे वारी. कोणत्याही संप्रदायात दैवत आणि दैवताची उपासना या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. संप्रदायाला एक प्रतिष्ठेची ओळख तेव्हा मिळते जेव्हा त्यांच्याकडे स्वत:चा ग्रंथ असतो आणि वारकरी संप्रदायाची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे.- डॉ. सदानंद मोरे, संतसाहित्याचे अभ्यासक

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेvarkariवारकरीPuneपुणे