संधिसाधूंच्या थापांना बळी पडू नका
By Admin | Updated: May 11, 2017 04:16 IST2017-05-11T04:16:20+5:302017-05-11T04:16:20+5:30
ज्या दिवशी देशात धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण केल जाईल. त्या दिवशी लोकशाही धोक्यात आली समजा. त्यानंतर

संधिसाधूंच्या थापांना बळी पडू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या दिवशी देशात धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण केल जाईल. त्या दिवशी लोकशाही धोक्यात आली समजा. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र सुध्दा धोक्यात येईल. समाज आज राजकीय फायदयासाठी विविध जाती धर्मात वाटण्याचे काम काही मुटभर राजकीय मंडळीनी करित आहे. या संधीसाधु लोकांच्या थापांना बळी न पडता या जगात माणुुसकी हाच खरा धर्म आहे. त्याचे पालन अपण सर्वांनी केल पाहिजे. याचे भान ठेवुन आचरण करावे असे मत तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पळसदेव येथे पवार च^रिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित विविध महापुरूषांची सामुहीक जयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते.
तालुक्यातील वाळु बंदी करण्यासाठी नागरीकांना न घाबरता सहकार्य केल्यास इंदापुर तालुक्यात शंभरटक्के अवैदय वाळु उपसा बंद करण्यात यशस्वी होवु असाही विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
मानखेडकर म्हणाले, युवकांनमध्ये हारल्यावरही उभा राहण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली पाहीजे.
एवढी मोठी युवा शक्ती राष्ट्रनिमीर्तीच्या कामास खर्ची झाल्यास देश जगावर राज्य करेल. आज विविध महापुरूषांच्या जयंतीच्या निमीत्ताने त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून करण्यात आले. यावेळी डा^ॅ. शितलकुमार शहा, एकनाथ शेलार , नानासाहेब नायकवडी , पंढरिनाथ बोंद्रे , नवनाथ शिंदे , स्वप्नील काळे , अनुराधा शहा ,महेश निंबाळकर ,गणेश काकडे, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होत्या.