शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकास करताना पक्षी अभयारण्याचे नुकसान होऊ देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:44 IST

मेट्रोच्या कामामुळे डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याला धोका निर्माण झाला

ठळक मुद्देवनमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना पत्र : अंमलबजावणी योग्य व्हावी 

पुणे : मेट्रोच्या कामामुळे डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याला धोका निर्माण झाला. त्याविरोधात पक्षीप्रेमींनी सातत्याने आंदोलन केले. आता खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहून याबाबत योग्य ती काळजी घेऊन अभयारण्याला नुकसान होणार नाही, यावर लक्ष द्यावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेला हे पत्र अद्यापही मिळालेले नाही.  वनाज ते रामवाडी मेट्रोचा मार्ग कल्याणीनगर येथून जात आहे. पूर्वी हा मार्ग आगाखान पॅलेस जवळून जात होता. परंतु, ते राष्ट्रीय स्मारक असल्याने त्याच्या बाजूने मार्ग नेता येत नव्हता. म्हणून हा मार्ग कल्याणीनगर येथील नदी पात्रातून केला जात आहे. त्यामुळे येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात अनेकदा नागरिकांनी रस्त्यावर येऊन विरोध केला. परंतु, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मार्ग या अभयारण्याच्या बाजूने जाणार असल्याचे सांगितले. आता याबाबतची दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. त्यांनी देखील पक्षी अभयारण्याला नुकसान होणार नाही, असे पत्र पुणे महापालिकेला पाठविले आहे. याबाबत पुणे महापालिकेकडे विचारणा केली असता, त्यांना अद्याप तरी हे पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. खरंतर मुनगंटीवार यांनी पत्र लिहून २५ दिवस होऊन गेले आहेत. एवढ्या दिवसात पत्र मिळाले नसेल, तर यात काहीतरी गडबड असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले आहे. याबाबत पक्षी संशोधक धर्मराज पाटील म्हणाले,‘‘वनमंत्र्यांनी याबाबत लक्ष घातल्याने पक्षी अभयारण्यासाठी सकारात्मक बाब आहे. त्यांचे पत्र स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. तरच त्याचा उपयोग होणार आहे. कारण पक्षी अभयारण्यात जैवविविधता आहे. ते वाचविणे आवश्यक आहे.’’ 

पुणे महापालिकेकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याबाबत पाठविलेले पत्र अद्याप मिळालेले नाही. - मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोforest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका