शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 23:28 IST

Dnyanradha Credit Society Scam: गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून सीआयडीच्या पथकाने अटक केल्याचे म्हटले जात आहे.

Dnyanradha Credit Society Scam: ज्ञानराधा मल्टिस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून बीडसह राज्यभरातील लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडवल्या. ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून सीआयडीच्या पथकाने अटक केल्याची माहिती मिळाली आहे. 

जून २०२४ मध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदकर यांना पोलिसांनी अटक केली होती. तर, पत्नी अर्चना कुटे फरार घोषित केले होते. ज्ञानराधा मल्टिस्टेट संदर्भात छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत. सुरुवातीला बीडमधील गुन्ह्यांचा तपास बीड पोलिसांनी करून ८० मालमत्ता जप्त केल्या. तसेच अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष वसंत कुलकर्णीसह एकूण १० आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर या प्रकरणात एमपीआयडी प्रस्तावही दाखल केला. परंतु एप्रिल २०२५ मध्ये हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला अन् त्याला संथ गती आली, असे सांगितले जात आहे. 

गतवर्षी कुटे ग्रुपच्या सर्वच समुहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचे उघडकीस आले होते. ‘द कुटे ग्रुप’वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या व्यवहारावर झाला. मोठ्या प्रमाणात ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. पॅनिक होऊ नका, शांततेत घ्या, कुटे ग्रुपला लोन मंजूर झाले आहे, अशी दिशाभूल करणारे वक्तव्य करत ठेवीदारांना झुलवत ठेवणार्‍या कुटे ग्रुपने एक रूपयाही दिला नाही. अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचार्‍यांवर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. 

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात बैठक घेतली होती. यात सीआयडीचा संथ तपास पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करत कान टोचले. तसेच बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या २३८ मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले होते. तसेच फरार १९ आरोपी सापडत नसल्यानेही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणेला खडेबोल सुनावले होते.

 

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेBeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी