शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'विठ्ठल-रुख्मिणी'ने  केला धावा आणि ज्ञानेश्वराने वाचवले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 20:21 IST

अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती .

ठळक मुद्देप्राणांची बाजी लावत दत्तवाडी भागातील ज्ञानेश्वर राऊतने चौघांना वाचवले 'विठ्ठल-रुख्मिणी'ने  केला धावा आणि ज्ञानेश्वराने वाचवले प्राण 

पुणे :अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती . 

बुधवार (दि. २५) रोजी झालेल्या पावसामुळे शहरात चांगलीच दाणादाण उडालेली बघायला मिळाली. काही तासांमध्ये आलेल्या पावसाच्या सरींनी शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. काडी काडी जमवून उभे केलेले संसार डोळ्यासमोर वाहून जाताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. अशाच एका क्षणी जुन्या दत्तवाडीत भागात प्रवेश केला आणि तिथल्या फरशीपुलापासून स्थानिकांची घरं, गाड्याही वाहून गेल्या. त्यामुळे डोळ्यासमोर अनेक नागरिक बेघर झालेली असताना या तरुणाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे यात शंका नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी भागात ज्ञानेश्वर राऊत हा तरुण राहतो. तिथेच असणाऱ्या प्रेरणा वॊशिंग सेंटरमध्ये काम करत शेजारीच त्याचं घर आहे. बुधवारी पाणी वाढल्यावर त्याने तात्काळ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.बाहेर पडल्यावर फरशीपुलावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्याला एक मुलगा वाहून आल्याचे दिसून आले. काही क्षण त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला तर मुलगा हातातून निसटून गेला. मात्र पुढे जाऊन तो पत्र्याच्या छतावर अडकला. मुलगा आक्रोश करत होता पण प्रवाह बघून कोणीही आत जाण्यास धजावत नव्हते. पण ज्ञानेश्वरने मात्र काही मागच्या पत्र्यांवर चढून मुलापर्यंत पोचला आणि त्याला वाचवले. 

मुलाला घेऊन परतत असताना त्याला पायाखालून 'आम्हाला वाचवा' असा आवाज यायला लागला. तेव्हा त्याच्या जवळच राहणारे क्षीरसागर कुटुंबीय घरात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. पती विठ्ठल, पत्नी रुख्मिणी आणि मुलगी मनीषा असे कुटुंब वाचवण्यासाठी हाका मारत होते पण रात्र वैऱ्याची होती. ज्ञानेश्वरने मुलाला सुरक्षित पोचवले आणि तो पुन्हा थांबला. अखेर त्याने प्रयत्न करून पत्रा उचकण्यास सुरुवात केली. आजूबाजूला पाणी आणि वर धुवाधार बरसणारा पाऊस त्यामुळे त्याचे काम अवघड होते. पण अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि तिघेही सुखरूप बाहेर पडले. स्वतःसाठी जगणाऱ्यांच्या जगात दुसऱ्यासाठी जीवावर उदार होणाऱ्या या धाडसी तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

  • क्षणभर मलाही भीती वाटली होती पण माझ्यासमोर त्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट होते. अडचणी येत होत्या पण त्यांचे जीव वाचले याचा अधिक आनंद आहे. आपण सगळे माणसं आहोत एकमेकांना मदत करायलाच हवी. 

    ज्ञानेश्वर राऊत, धाडसी तरुण 

 

  • ज्ञानेश्वर होता म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आम्ही प्रयत्न करूनही पाण्याच्या लोंढ्यामुळे दार उघडत नव्हते. तो देवदूतासारखा आला. घर सगळे वाहून गेले आहे पण जीव वाचला याचाच आनंद आहे. 

    रुख्मिणी क्षीरसागर, पाण्यात अडकलेल्या महिला 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर