शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी

By नितीन चौधरी | Updated: November 22, 2023 13:30 IST

या दिवाळीत अर्थात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या महिनाभरात ७ हजार ५५० घरांची खरेदी झाली आणि बांधकाम क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे...

पुणे : उत्साह आणि आनंदाची उधळण करीत यंदाच्या दिवाळीने सर्वच क्षेत्रांत चैतन्य आणले आहे. बांधकाम क्षेत्रही याला अपवाद नाही. या दिवाळीत अर्थात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या महिनाभरात ७ हजार ५५० घरांची खरेदी झाली आणि बांधकाम क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे. गतवर्षीही या काळात ७ हजार ६०० घरांची घरेदी झाली होती. यावरून कोरोनामुळे आलेली काजळी दिवाळीत दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनामुळे २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या काळात बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी पसरली होती. ही काजळी दूर करण्याचे काम दिवाळी सणाने केले आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतच्या महिनाभराच्या काळात सलग दोन वर्षे घर खरेदीचा उच्चांक स्थापन झाला आहे.

शहरात घरखरेदी जोमात सुरू असून, पाडव्याच्या मुहूर्तावर घरांचे मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे. पुढील दोन महिन्यांच्या काळात यात आणखीन वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ने व्यक्त केली आहे. या घरखरेदीत मोठ्या घरांचा वाटा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

स्पेसियस घरांना अधिक पसंती :कोरोनामध्ये विलगीकरण माेठ्या प्रमाणावर करावे लागल्याने माेठ्या घराची गरज प्रकर्षाने भासली. शिवाय याच काळात घरातूनच काम अर्थात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आली. त्यामुळे पुढील काळात नागरिकांनी घर खरेदी करताना माेठ्या घरांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या घर खरेदीत मोठा वाटा हा स्पेसियस घरांचा आहे.

‘क्रेडाई’या आकडेवारीनुसार...

७ हजार ५५० घरांची खरेदी

यंदाच्या दिवाळीतील उलाढाल (१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर)

७ हजार ६०० घरांची खरेदीगतवर्षी दिवाळीतील उलाढाल (२५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर)

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अधिक बुकिंग :

‘क्रेडाई’चे जनसंपर्क अधिकारी कपिल गांधी म्हणाले, “घर खरेदी तसेच बुकिंगचे प्रमाण दसऱ्याच्या काळात खूप वाढते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणावर घरांचे बुकिंग झाले असून, यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.”

काेणत्या भागाला मिळतेय अधिक प्राधान्य?- शहराचा विचार करता पश्चिम भाग, मध्यवर्ती भाग, तसेच उत्तर पुण्याच्या भागात हिंजवडी, औंध, बाणेर या परिसरात आयटी कंपन्यांचे प्राबल्य आहे. याला जोडूनच औद्योगिक भाग आहे. विशेष म्हणजे हा भाग ‘एक्स्प्रेस-वे’ने मुंबईशी जोडला आहे.

- मेट्रोची कनेक्टिव्हिटी देखील वाढली आहे. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा, महाविद्यालयेदेखील तुलनेने या भागात जास्त आहेत. त्यामुळे शहराच्या इतर भागांच्या तुलनेत या भागात घरखरेदीला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

- पूर्व पुण्यातील हडपसर, खराडी, वाघोली, कल्याणीनगर, विमाननगर या भागांतही आयटी कंपन्या वाढत आहेत. त्यामुळे या परिसरातही घर खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत, असे ‘क्रेडाई’, पुणेचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या तिजाेरीत ३४६ कोटी :

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माहितीनुसार, शहरात १ ते २० नोव्हेंबरदरम्यान १२ हजार ६९२ दस्तांची नोंदणी झाली. यातून ३४६ कोटी १८ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा महसूल राज्य सरकारकडे जमा झाला आहे. १ ते ९ नोव्हेंबर या काळात दररोजची दस्त नोंदणी १ हजारांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ९ नोव्हेंबरला उच्चांकी १ हजार ८२० दस्तांची नोंदणी झाल्याची माहिती पुणे शहराचे सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली. दसऱ्यानंतर धनत्रयोदशीपर्यंत घराचे बुकिंग केलेले असल्यास त्याची दस्त नोंदणी करून घ्यावी, असा ग्राहकांचा कल असतो. त्यानंतर येणाऱ्या सुट्या लक्षात घेऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया धनत्रयोदशीपूर्वीच केली जात असल्याने ही संख्या वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तारीख : दस्त नोंदणी१ नोव्हेंबर : ११५९

२ नोव्हेंबर : ११६६३ नोव्हेंबर : १३४५

४ नोव्हेंबर : २६९५ नोव्हेंबर : ३३३

६ नोव्हेंबर : ११०१७ नोव्हेंबर : १२८९

८ नोव्हेंबर : १०४९९ नोव्हेंबर : १८२०

११ नोव्हेंबर : २८४१३ नोव्हेंबर : ४३९

१६ नोव्हेंबर : ५८५१७ नोव्हेंबर : ८१५

१८ नोव्हेंबर : १७२१९ नोव्हेंबर : १०९

२० नोव्हेंबर : ७५७एकूण १२,६९२

एकूण महसूल

३४६ कोटी १८ लाख ४४ हजार ९८०

यंदाची दिवाळी बांधकाम क्षेत्राला तुलनेने चांगली गेली आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये आणखी प्रतिसाद वाढून घरखरेदी वाढण्याची अपेक्षा आहे. यंदा सुमारे साडेसात हजार घरांची विक्री झाली आहे. कोरोनानंतर सलग दोन वर्षे बांधकाम क्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवाळीचा काळ चांगला गेला, असे म्हणता येईल.

- रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, ‘क्रेडाई’, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHomeसुंदर गृहनियोजन