शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कालवाबाधितांची ‘दीन’ दिवाळी, मदत न पोहोचल्याने पडक्या घरांमध्येच उजळविले दीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 01:51 IST

‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली.

पुणे - ‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली.एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप अनेक बाधितांच्या खात्यात शासकीय रक्कम पोहोचली नाही. घरच नाही तर दिवाळी कुठे साजरी करावी? असा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी घरांमध्ये घुसले आणि आयुष्यभर कमावलेले सर्व आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यानंतर प्रत्येक बाधिताला सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी आश्वासने देऊन नेते निघून गेले.आजही अनेकांची घरे मोडलेल्या अवस्थेत आहेत. मोडक्या पडक्या घरात कसेबसे दिवस ते काढत आहेत. कोणीतरी साहेब येईल, आपल्याला मदत देईल, त्यातून पडलेले घर पुन्हा उभे राहील, या आशेवर रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, दिवाळीला सुरूवात झाली तरी केवळ २0 बाधितांना घरे मिळाली आहेत. जिल्हा प्रशासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे, अशा भावना बाधितांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.मुन्नी शेख म्हणाल्या, दिवसभर पडक्या घरात बसून किंवा शेजारी बसून आम्ही दिवस काढतो. तर रात्री नातेवाइकांकडे झोपायला जातो. केवळ २0 बाधितांना घरे दिली असून, अनेकांच्या डोक्यावर अजूनही छप्पर नाही. अधिकाºयांकडून पुराव्यासाठी कागदपत्रे मागितली जातात. घराच्या चारही भिंतीबरोबर सर्वच वाहून गेल्यानंतर पुरावे कुठून द्यावेत.कालवाबाधित धनीराम सरोज म्हणाले, बँक खाते नाही, त्यामुळे अनेकांच्या खात्यात रक्कम जमा करता येत नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.माझ्यासह अनेकांनी एकदा नाही तर दोन वेळा बँक खात्याची माहिती दिली आहे. मात्र, रक्कम जमा करण्यास टाळाटाळा केली जात आहे. तर बँक खाते हे राष्ट्रीयीकृत बँकेचे असावे असा आग्रह धरला जात आहे.

टॅग्स :Puneपुणे