शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिव्यांग विद्यार्थी अधिका-यांची ‘नेत्रदीपक’ यशोगाथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:19 IST

अविश्रांत प्रयत्न, अदम्य जिद्द याच्या जोरावर त्या ‘‘कोल इंडिया’’ या कंपनीतील पहिल्या दृष्टीदिव्यांग अधिकारी होण्याचा मान सोनम साखरे यांनी मिळवला आहे.

ठळक मुद्देबिलासपूरला राजभाषा अधिकारी या पदावर कार्यरत

पुणे : मनात आणलं तर अशक्य असे काहीही नसते. याची प्रेरणात्मक प्रचिती सोनम साखरे यांच्या व्यक्तिमत्वातून येते. अविश्रांत प्रयत्न, अदम्य जिद्द याच्या जोरावर त्या ‘‘कोल इंडिया’’ या कंपनीतील पहिल्या दृष्टीदिव्यांग अधिकारी होण्याचा मान सोनम साखरे यांनी मिळवला आहे. गरीब शेतकरी कुटूंबातील सोनम यांनी मोठ्या चिकाटीने आपल्या यशोगाथेचा आदर्श तरुणांसमोर उभा केला आहे.      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाच्या वतीने काही वर्षांपासून सातत्याने रोजगारप्रधान शिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात आहे. या माध्यमातून दृष्टी-दिव्यांगांना (पूर्ण किंवा अंशत: दृष्टिदोष) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षण घेण्याची संधी विद्यापीठात मिळत असल्याची उदाहरणे आशादायी आहेत. हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी असणारे निशांत शहा आणि माजी विद्यार्थिनी सोनम साखरे सध्या शासकीय सेवांमध्ये भाषा अधिकारी पदावर कार्यरत आहेत.  त्या मूळच्या चंद्रपूर तालुक्यातील.  या वर्षी ’’कोल इंडिया’’  कंपनीत भाषा अधिकारी पदावर नियुक्त झाल्या आहेत. आपल्या यशाबद्द्ल बोलताना त्या म्हणतात की,  नोकरीसाठी मुलाखत सुरू झाली तिथून नियुक्ती झाल्याचा पहिला दिवस ते आजपर्यंत रोज सगळेजण आपलेपणाने समजून घेतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने व विद्यापीठात मिळालेल्या दर्जेदार शिक्षणाने मला इथे काम करताना कधीही अडचणी येत नाहीत. सर्व प्राध्यापक विशेषत: विभागप्रमुख प्रा. सदानंद भोसले सर नवीन संधी आणि ती संधी रोजगार म्हणून कशी मिळवता येईल यावर सतत मार्गदर्शन करत होते. त्यासाठी इतर आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी मदत केली म्हणून आज बिलासपूरला आपण राजभाषा अधिकारी या पदावर कार्यरत झालो आहोत. हया प्रवासात आजीने आणि आईने मला खूप मोठी मदत केली. माझी आजी तिच्या वेळची सातवी शिकलेली होती. ती काम करून दमलेली असली तरी मला शालेय जीवनापासून सगळे धडे मला वाचून दाखवायची. म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. घरात बाई शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते यावर  माझा यामुळेच विश्वास बसतो. तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीGovernmentसरकार