शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तलाक दिलेल्या पत्नीने पतीवर केला चाकूने हल्ला; मालिकेतील घटना प्रत्यक्षात

By विवेक भुसे | Updated: September 1, 2022 15:23 IST

पती तलाक दिल्यानंतरही तो ठेवून होता तिच्यावर नजर

पुणे : आई कोठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध याने अरुंधतीला घटस्फोट दिला आहे. तरी तिचे अशितोष केळकरबरोबरचे भेटणे, त्याच्याबरोबर काम करणे त्याला आवडत नसते. तो सातत्याने त्यावरुन तिला सर्वांसमोर सुनावत असतो. तसाच काहीसा प्रसंग पिसोळीत घडत होता. पण, ही महिला अरुंधतीसारखी शांतपणे सहन करत बसली नाही. तिने मी या तरुणाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगून घरातील चाकूने आपल्या पूर्वश्रमीच्या पतीवर वार करुन जखमी केले.

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही पिसोळीमधील एका सोसायटीत २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला एक महिन्यांपूर्वी तलाक दिला आहे. ही महिला पिसोळी येथील एका सोसायटीत राहते. तलाक दिला असला तरी तो आपल्या पत्नीवर नजर ठेवून होता. तिला भेटायला एक तरुण येत असल्याची माहिती त्याला मिळाली. तेव्हा त्याने सोसायटीच्या वॉचमनला सांगून ठेवले होते. हा तरुण त्याच्या पत्नीला भेटायला २८ तारखेला सायंकाळी आला होता. वॉचमनने ही बाब या पूर्वश्रमीच्या पतीला सांगितली. तेव्हा तो तिच्या फ्लॅटवर गेला. त्या तरुणाला व तिला त्याने विचारणा केली. तेव्हा तिने आपण या तरुणाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तिने घरातील चाकूने आपल्या पूर्वश्रमीच्या पतीच्या मानेवर मारुन त्याला जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक