शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ अ‍ॅपद्वारे घेतला जर्मनीतून घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 01:48 IST

कुटुंब न्यायालयातून स्काईप, व्हॉट्सअ‍ॅपवरून सुनावणीद्वारे परदेशातून घटस्फोट झाल्याची अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.

पुुणे : कुटुंब न्यायालयातून स्काईप, व्हॉट्सअ‍ॅपवरून सुनावणीद्वारे परदेशातून घटस्फोट झाल्याची अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र, या सर्वांत कनेक्टिव्हिटी, फोटो आणि व्हिडीओच्या क्वालिटीबाबत तक्रार असायची. पण, आता सुनावणीदेखील अगदी एचडी स्वरूपात व कुटुंब न्यायालयातील विशेष रूममधून होणार आहे.आॅनलाईन सुनावणीसाठी शासनाने कौटुंबिक न्यायालयासाठी एक व्हिडीओ अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवरून देशात अथवा परदेशात कोठेही असलेल्या व्यक्तीला मोबाईलवरून न्यायाधीशांशी संवाद साधता येईल.विशेष म्हणजे, स्काईपद्वारे सुनावणीच्या वेळी परदेशात असलेल्या व्यक्तीला तेथील न्यायालयात जावे लागते. त्या वेळी काही अडचणी येण्याची शक्यता असते. मात्र, या अ‍ॅपवरून घरात बसून अथवा ती व्यक्ती जिथे असले तेथून कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, न्यायाधीशांशी संवाद साधू शकेल. विशेष म्हणजे, ज्याच्या मोबाईलवरून बोलण्यात येत आहे. त्याचे नावही या अ‍ॅपवर दिसेल. नुकताच कौटुंबिकन्यायालयात जर्मनीतील एकाआयटी इंजिनिअरशी संवाद साधून परस्परसंमतीने घटस्फोट मंजूर करण्यात आला.अशोक आणि मीना (नावे बदललेली) अशी या दोघांची नावे आहेत. अशोक हा आयटी इंजिनिअर असून मीना एका खासगी कंपनीत नोकरी करते. मीना सध्या पुण्यात आहे, तर अशोक नोकरीनिमित्त जर्मनी येथे असतो. मीनाचे यापूर्वी लग्न झालेले आहे. पहिल्या पतीपासून तिला मुलगी आहे.या मुलीचा स्वीकार करून अशोकने २०११मध्ये मीनाशीलग्न केले होते. सहा ते सात वर्षे दोघांचा संसार सुखात सुरू होता;मात्र वैचारिक कारणांमुळे दोघांतवाद होऊ लागले. त्यातूनचदोघांनी ६ महिन्यांपूर्वी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता.घटस्फोटासाठी जर्मनीतून पुण्यात येणे शक्य नसल्याने अशोकला अ‍ॅपची लिंक पाठविण्यात आली. त्यावरून समुदेशक आठवले यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाषकाफरे यांनी अशोकबरोबर घटस्फोटाबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांना परस्परसंमतीने घटस्फोट मंजूर केला.अशोकने कोथरूड भागात असलेल्या सुमारे सव्वा कोटी रुपयांचा ३ बीएचके फ्लॅट मीनाला देण्याचे मंजूर केले आहे.>प्रत्येक न्यायालयात बसविणार स्क्रीनसध्या न्यायाधीशांना व्हिडीओ रूममध्ये जाऊन पक्षकारांशी संवाद साधावा लागत आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातील प्रत्येक न्यायालयात स्क्रीन बसविण्यात येणार आहे. ज्याद्वारे न्यायाधीशांना डायसवर बसूनच न्यायालयातूनच संवाद साधता येईल. तर, उच्च न्यायालय, एनजीटीच्या धर्तीवर प्रत्येक न्यायालयाच्या बाहेर स्क्रीन बसविण्यात येणार आहे. ज्यावर कोणती सुनावणी सुरू आहे? पुढील कोणती सुनावणी असेल? हे पक्षकार, वकिलांना समजेल, अशी माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.

टॅग्स :marriageलग्न