शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाचा दावा अवघ्या दोन महिन्यांत निकाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 20:01 IST

वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक न्यायालयाचा निर्णय, दोघेही उच्चशिक्षित

पुणे : वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा केवळ दोन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून दोघे वेगवेगळे राहत होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा निर्वाळा घेत या प्रकराचा केवळ दोन महिन्यांत निकाल लावण्यात आला आहे.कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश पलक जमादार यांनी हा दावा निकाली काढला. तुषार आणि हेमा (नावे बदलली आहेत) या दोघांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना एक ८ वर्षांची मुलगीही आहे. तुषार मर्चंट नेव्हीमध्ये सिंगापूर येथे चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. तर हेमा शहरातील नामांकित बिल्डरची मुलगी असून त्या वडिलांची कंपनी चालवत आहे. लग्नानंतर त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे एकमेकांशी सुर जुळत नव्हते. त्यामुळे ते २०१० पासून वेगळे राहत होते. त्यानंतरही दोघांचे पटेनासे झाल्यावर घटस्फोट मिळावा म्हणून त्यांनी अ‍ॅड. विक्रांत शिंदे यांच्यामार्फत ०८ आॅगस्ट रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता.              अ‍ॅड. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा न्यायालयाला दाखला सादर करून घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतरचा कमीतकमी लागणारा कालावधी कमी करून लवकर निर्णय द्यावा, असा युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात सहा महिन्याचा कालावधी वगळून त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. दरम्यान वाद झाल्यानंतर हेमा यांची तबीयत खालावली होती. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करून देखील न्यायालयाने हे प्रकरण लवकर निकाली लावले, असे शिंदे यांनी सांगितले. हिंदु विवाह कायद्याप्रमाणे पती पत्नी सहसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी पती पत्नी एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील तर ते घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात. हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात येतो. ............................मुलीला फ्लॅट गिफ्ट तुषार आणि हेमा यांना ८ वर्षाची मुलगी आहे. आई वडिल विभक्त झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यातील इतर खर्चाचा विचार करून तुषार यांनी पाषाण येथे असलेले १ हजार ४०० चौरस फुटाचा एक फ्लॅट तिच्या नावावर केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटadvocateवकिलCourtन्यायालयmarriageलग्न