शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:54 IST

पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे.

ठळक मुद्देमहामंडळाच्या वाहतुक विभागाने पुणे विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे दिली माहिती इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील प्रवासी संख्याही अधिक

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) विभागीय कार्यालयांमध्ये आता बारामती विभागाची भर पडणार आहे. पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे. त्यामुळे एकुण विभागांची संख्या ३२ होणार आहे.एसटी महामंडळाची सध्या राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी ३१ विभागीय कार्यालये आहेत. प्रशासकीय विभागानुसार मुंबई विभागात ६, पुणे ५, नाशिक ४, औरंगाबाद ७, अमरावती ४ तर नागपूरमध्ये ५ विभाग येतात. एकुण ३१ विभागांतर्गत २४७ आगार तर ५७८ बसस्थानके आहेत. या विभागांमध्ये आता लवकरच बारामती विभागाची भर पडणार आहे. पुणे विभागामध्ये सध्या बारामती आगाराचे उत्पन्न इतर आगारांचे तुलनेत अधिक आहे. तसेच इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभागातील प्रवासी संख्याही अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पुण्यासह सातारा व सोलापूर विभागातील काही आगार वेगळे करून बारामती हा नवीन विभाग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला पुन्हा चालना मिळाली असून संबंधित विभाग नियंत्रकांकडून याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.महामंडळाच्या वाहतुक विभागाने पुणे विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या पत्रानुसार, बारामती येथे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी पुणे विभागातील बारामती, बारामती एमआयडीसी, दौंड, इंदापूर, शिरूर, सोलापूर विभागातील करमाळा व अकलूज तर सातारा विभागातील फलटण असे एकुण ८ आगार प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे विभागात सध्या १२, सोलापुर ९ तर सातारा विभागात ११ आगार आहेत. याअनुषंगाने संबंधित आगारांचा नफा-तोटा, चलनीय तसेच भौगोलिक, राजकीय व प्रशासकीय परिस्थितीची माहिती, नवीन विभाग निर्मितीसाठी आवश्यक निकषांवर आधारित मत तसेच सातारा व सोलापूर विभागांची माहिती संकलित करावी, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.-------------बारामती विभागासाठी प्रस्तावित आगार - बारामती, बारामती एमआयडीसी, दौंड, इंदापूर, शिरूर, करमाळा, अकलूज, फलटण.----------एसटीची सद्यस्थिती -विभाग - ३१आगार - २४७बसस्थानके - ५७८-----------------बारामती विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे समजते. त्यावर विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र, याबाबतचे पत्र अद्याप मिळालेले नाही. - यामिनी जोशी, विभाग नियंत्रकपुणे विभाग

टॅग्स :Baramatiबारामतीpassengerप्रवासीSolapurसोलापूरSatara areaसातारा परिसर