शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी बाजार समित्यांच्या विभाजनाचा घाट?; नागपुरात झाली बैठक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:43 IST

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन हवेली आणि पुणे जिल्हा बाजार समित्या वेगळ्या करण्यासोबतच त्यावर नवे प्रशासकीय मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देपुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर १४ वर्षांपासून प्रशासक १९६३च्या तरतुदीनुसार मुदत संपल्यामुळे बाजार समित्यांच्या घ्याव्या लागणार पुन्हा निवडणुका

पुणे : पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन हवेली आणि पुणे जिल्हा बाजार समित्या वेगळ्या करण्यासोबतच त्यावर नवे प्रशासकीय मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी विभाजनाचा घाट घालण्यात येत असून यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नागपूर येथील ‘कुटीर’ बंगल्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या बनविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातच आता या बाजार समित्यांच्या विभाजनाचा विषय आल्याने ही निवडणूक प्रक्रिया लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपुरमध्ये झालेल्या बैठकीत बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळामध्ये आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची वर्णी लागावी अशी मागणी आमदारांनी केली. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर १४ वर्षांपासून प्रशासक आहेत. प्रशासकीय मंडळाचा कालखंड दोन वर्षांचा झाला आहे. हवेली, मांजरी आणि प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दोन वर्षांपूर्वी एकत्रीकरण करण्यात आलेले होते.  उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३च्या तरतुदीनुसार मुदत संपल्यामुळे बाजार समित्यांच्या पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हाधिका-यांना प्रारूप मतदारयाद्या बनविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. निवडणुका टाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रादेशिक बाजार समिती असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर हवेली, मांजरी व प्रादेशिक समित्यांचे एकत्रीकरण झाले. सध्याच्या पुणे कृषी बाजार उत्पन्न समितीचे आता पुन्हा हवेली व पुणे जिल्हा असे विभाजन करण्यात येणार आहे. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी देखील आमदारांची चर्चा झाली आहे. प्रशासकीय मंडळावर ज्यांची वर्णी लावायची त्यांची नावे देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनतर सहकार उपनिबंधकांकडून अहवाल मागवून या नेमणुका केल्या जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :market yardमार्केट यार्डgirish bapatगिरीष बापटRaosaheb Danweरावसाहेब दानवे