पाटसला श्रीगुरुदेव दत्त पतसंस्थेचा लाभांश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST2020-12-03T04:21:46+5:302020-12-03T04:21:46+5:30

यावेळी रमेश जाधव, धोंडिबा दिवेकर, राजेंद्र पानसरे, राजेंद्र शिंदे, जयंत पाटील, जगदीश माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ...

Dividend of Shrigurudev Dutt Patsanstha to Pats | पाटसला श्रीगुरुदेव दत्त पतसंस्थेचा लाभांश वाटप

पाटसला श्रीगुरुदेव दत्त पतसंस्थेचा लाभांश वाटप

यावेळी रमेश जाधव, धोंडिबा दिवेकर, राजेंद्र पानसरे, राजेंद्र शिंदे, जयंत पाटील, जगदीश माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार महर्षी मधुकरराव शितोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्वशील शितोळे म्हणाले की, संस्थेने नेहमीच नागेश्वर देवाच्या यात्रेनिमित्ताने सभासदांना लाभांश वाटप केला जातो. सभासदांचे हित जोपासूनच संस्थेचे कामकाज केले जाते, असे शितोळे म्हणाले.

संस्थेचे सचिव मिलिंद दोशी म्हणाले की, सभासद हा सहकारी संस्थेचा कणा असतो त्यामुळे संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना त्याचा लाभ अधिकाराने मिळावा म्हणून दरवर्षी लाभांश वाटप केला जातो. संस्थेचे कर्मचारी सोमनाथ कुंभार, शैैलेश इंगुळकर, संगीता मरगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

फोटो ओळ

श्रीगुरुदेव दत्त बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना लाभांश वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष सत्वशील शितोळे, सचिव मिलिंद दोशी.

0२१२२0२0-दौंड-२१ न्यू

--------------------

Web Title: Dividend of Shrigurudev Dutt Patsanstha to Pats